ETV Bharat / health-and-lifestyle

आरोग्यासोबतच सौंदर्यासाठी अंडी फायदेशीर; हा भाग लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा - EGG BENEFITS FOR FACE SKIN

अंडी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे सर्वांना माहिती आहे. परंतु सौंदर्याच्या दृष्टीने देखील अंडी महत्त्वाची आहेत. वाचा सविस्तर..,

EGG BENEFITS FOR FACE SKIN  Egg White On Face For Acne  Egg White Face Mask For Pimples  Benefits For Face Skin
सौदर्येसाठी अंडी फायदेशीर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Jan 28, 2025, 2:16 PM IST

Egg Benefits For Face Skin: आपल्यापैकी अनेक लोक सकाळच्या न्याहारीत अंडी खातात. रोज अंडी खाल्ल्यास आरोग्यदायी अनेक फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते, अंड्यामध्ये प्रथिनांसह, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रोटीन, कार्ब्स, झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी 2, बी 5, बी 12 तसचं व्हिटॅमिन डी यासारखे पोषक घटक आढळतात. जे सुदृष्ढ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, अंडी केवळ आरोग्यासाठीचं नाही तर सौंदर्यासाठी देखील फायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे. चाला तर पाहूया सौंदर्याच्या दृष्टीनं अंडी कशी फायदेशीर आहेत.

अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा टाळता येतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावल्यास त्वचा टाईट होते. असं 2018 मध्ये, जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्माटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या "एग व्हाइट प्रोटीन ॲज अ स्किन टाइटनिंग एजंट" या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. अंड्याचा पाढऱ्या भागाचा लेप आठवड्यातून दोनदा लावल्यानं चेहऱ्यावर तारुण्यासारखी चमकू येवू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांखाली सूज आल्याने अस्वस्थता जाणवते. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या भागानं डोळ्याच्या खाली हळू-हळू मसाज करा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामासाठी चेहरा धुतल्यानंतर खोबरेल तेल लावा. असं केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.
  • तज्ज्ञांच्या मते, अंडी मुरुमांवर चांगले काम करते. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये टी ट्री ऑइलचे दोन किंवा तीन थेंब टाका आणि ते पिंपल्सवर हळूहळू लावा. यामुळे पिंपल्स आणि त्यामुळे होणारे डाग कमी होतात. शिवाय, असं म्हटलं जातं की, तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी ही टिप फॉलो कल्यास त्यांना समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
  • चेहऱ्यावर जास्त छिद्र असलेल्या लोकांनी प्रथम कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि अंड्याचा पांढरा थर चेहऱ्याला लावा. चेहरा वाढल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धूवा. असं केल्यास त्वचेचे छिद्र स्वच्छ होतात.
  • अंड्यातील पांढऱ्या भागासह पिवळा बलक देखील चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. पिवळा बलक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला आवश्यक मॉइश्चरायझर मिळतं. आणि त्वचा हायड्रेट राहते. तसंच पिवळा बलक वातावरणातील प्रदूषणापासून त्वचेचे रक्षण करते असं जाणकारचं मत आहे.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7555751/

हेही वाचा

  1. ओठांना नैसर्गिक चमक देण्यासाठी घरीच तयार करा हे 'लिपबाम'
  2. सावधान! तुम्ही देखील रात्री जीन्स घालून झोपता?
  3. डोक्यात सतत विचारांचा कल्लोळ? आजच फॉलो करा या टिप्स
  4. पोट सुटलंय? व्यायामाशिवाय अशाप्रकारे करा पोटाची चरबी कमी
  5. वर्कआउटनंतर पाणी पिणं पडेल महागात? पाणी पिताना 'ही' घ्या खबरदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.