महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश - Sanjay Pandey - SANJAY PANDEY

Sanjay Pandey : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी, आज मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय पांडे यांच्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वर्षा गायकवाड यांनी या सर्वांचं काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

Sanjay Pandey
संजय पांडेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 10:35 PM IST

मुंबई Sanjay Pandey: विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा शिंदे शिवसेनेच्या दोन नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यासह मुंबईत आंदोलन करण्यात आलं. त्यासोबत गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं मुंबई काँग्रेसला बळ मिळालं असल्याचं बोललं जातय.


वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश : मुंबई काँग्रेस कार्यलयात संजय पांडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार संविधान आणि लोकशाही वाचवण्याबाबत भूमिका घेतली आहे. त्यामुळं 400 पारचा नारा दिल्या नंतरही भाजपाला 240 वर रोखण्यात यश आलं आहे. यात आपल्या राज्याचा मोठा वाटा आहे.

प्रतिक्रिया देताना संजय पांडे (Etv Bharat Reporter)

आगामी काळात महाविकास आघाडी सरकार : गेल्या काही दिवसांपासून राज्याची पुरोगामी प्रतिमा मलिन करण्याचं काम महायुती सरकार करत आहे. सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देतात. मात्र धमकी देणाऱ्यावर कुठलीही कारवाई होत नाही. राज्यातील सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारवर अनेक जण पक्षासोबत येत आहे. त्यामुळं आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.


कितीही एजन्सी मागे लावा, आम्ही घाबरणार नाही : काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले की, 140 वर्ष जुना आणि अनुभवी पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा परिवार आहे. राहुल गांधी यांनी डरो मतचा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्षाचा विचार पक्का असून अनेक ऑफर आल्या नंतरही काँग्रेस पक्षातच प्रवेश केला. 2004 पासून काँग्रेस जॉईन करायची इच्छा होती. दुसरा कुठलाही पर्याय नाही. याच पक्षात यायचं आहे. आमची भूमिका सेक्यूलर आहे. आम्हाला संधी दिली जाईल. आमचं सरकार आल्यावर कुणालाही घाबरावं लागणार नाही. निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण या संदर्भात पक्ष निर्णय घेईल. ईडी, सीबीआयचा मीही व्हिक्टीम आहे. तसंच या संदर्भात कोर्टात केस लढेन. सदर केसचा आणि पक्ष प्रवेश याचा काहीही संबंध नसल्याचं पांडे यांनी म्हटलं.


मुंबईत आंदोलन: शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते अनिल बोंडे यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गुरुवारी काँग्रेस पक्षाकडून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात राज्यभर निदर्शने करत आंदोलनं करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथील निवास्थाना बाहेर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी, आंदोलकानी यावेळी लावून धरली होती.



हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींचा पालघर दौरा; आंदोलन करत काँग्रेसकडून निषेध, वर्षा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात - Congress Protest PM Visit Palghar
  2. धारावी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीकरिता १८ जण इच्छुक, वर्षा गायकवाड यांनी काय मांडली भूमिका ? - Assembly election 2024
  3. कुणी पती निधनानंतर रोवला विजयाचा झेंडा, कुणी नणंदेचा केला पराभव; जाणून घ्या लोकसभेतील विजयी 'रणरागिणी' - Lok Sabha Election Result 2024

ABOUT THE AUTHOR

...view details