नाशिकLOK SABHA ELECTION 2024 : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माझ्यावर अन्याय केलाय. मला नगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आलं. मला उमेदवारीचा शब्द दिला होता तीही दुसऱ्याला दिली. मी न्याय मागण्यासाठी विनंती केली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. अखेर मी उद्धव ठाकरे सेनेचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितलं.
उपनेते पदाचा दिला राजीनामा: गेल्या तीन महिन्यापासून ठाकरे गटासोबत न राहण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. आज संध्याकाळी पाच वाजता मुबंई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे. शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीमुळं बबन घोलप हे ठाकरे गटात नाराज झाले होते. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर करून सेना नेत्यांवर सडकून आरोप केले होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी पक्ष प्रमुख यांना आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देत फक्त शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेवटी घोलप यांचा आज शिंदे गटात पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.