महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा नागपूर दौरा; भाजपाकडून स्वागत रॅलीची तयारी - CM DEVENDRA FADNAVIS

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं १२ डिसेंबर रोजी नागपूरात आगमन होणार आहे. यासाठी भाजपाकडून स्वागत रॅलीची तयारी सुरू आहे.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 9:12 PM IST

नागपूर : शहराचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी (१२ डिसेंबर) रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाचं नागपूरला येत असल्यानं शहर भाजपातर्फे स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दुपारी ३ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यानंतर विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार येणार आहे. यानंतर ते विमानतळ चौकातील हेडगेवार स्मारक स्थळी वंदन करतील अशी माहिती, माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.



भव्य रॅली काढण्यात येईल :वर्धा मार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थापर्यंत स्वागताची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. हेडगेवार स्मारक स्थळापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. सोमलवाडा चौक, राजीव नगर चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौक, छत्रपतीचौक येथून डावीकडं खामला चौक येथून उजवीकडं तात्या टोपे चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक मार्गाने लक्ष्मी भुवन चौक येथे रॅली येईल. तर लक्ष्मी भुवन चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना माजी महापौर संदीप जोशी (ETV Bharat Reporter)



लाडक्या बहिणींकडून औक्षवण: रॅलीच्या मार्गावर विविध मंडळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात येणार आहे. रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौकामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्व नागपूर यांच्यातर्फे तर छत्रपती चौकामध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर, स्नेहनगर पेट्रोल पंपाजवळ लाडक्या बहिणींकडून औक्षवण, लक्ष्मीनगर चौकामध्ये भारतीय जनता पार्टी मध्य नागपूर, बजाज नगर चौकामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूर, शंकर नगर चौकामध्ये पश्चिम नागपूर मंडळाद्वारे स्वागत करण्यात येणार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये तफावत? निवडणूक आयोगानं दिलं थेट स्पष्टीकरण
  2. इंडिया आघाडीत मतभेद! राहुल गांधींबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
  3. लालू प्रसाद यादव यांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडं द्यावं"

ABOUT THE AUTHOR

...view details