नागपूर :"देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचा सन्मान करत होते, देवेंद्र फडणवीस त्यांचे लहान भाऊ सारखे काम करत होते. आता महाविकास आघाडीमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे. ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात, काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवतं. उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीची उपयोगिता संपलेली आहे," असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंबद्दल वाईट वाटतं :देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ असल्यासारखं काम करायचे. आता मविआमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे, ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात. काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवतं. उद्धव ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करा. मला उद्धव ठाकरेंबद्दल वाईट वाटतं. आम्ही त्यांना मानसन्मान दिला, मात्र त्यांनी सर्व माती केली. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री करणार नाहीत. 2019 मध्ये त्यांना महायुती फोडायची होती, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं," असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
संजय राऊतांवर टिका :उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय. मध्यप्रदेश सरकारनं सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' ही बंद पडली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यांचा दावा खोटा असल्यानं मध्यप्रदेश भोपाळ येथं संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "संजय राऊत खोटारडेपणा करतात. मध्यप्रदेश सरकारनं 1 कोटी 30 लाख महिलांना योजना सुरळीत सुरू आहे, असं तिथल्या मुख्यंत्र्यांनी माहिती दिलीय. संजय राऊत यांनी काँग्रेस शासित राज्य कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा बद्दल बोललं पाहिजे. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीला जनताधडा शिकवेल व लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार."