बीड Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचारासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी परळी येथे त्यांच्या घरी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे, भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक महिलांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर त्यांनी परळी येथील प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेऊन गोपीनाथ गडाकडं त्या प्रस्थान केलं. गोपीनाथ गडावर त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज सकाळपासून मी थोडी गंभीर आहे. मला शब्दामध्ये माझी भावना सांगता येणार नाही. कारण गोपीनाथ मुंडे हा अर्ज नेहमी भरत होते. मी त्यांच्याबरोबर असायचे. प्रचाराची जबाबदारी माझ्याकडे असायची. प्रीतम मुंडे यांच्यावेळीही प्रचारात मी मुख्य असायचे.आता स्वत:साठी अर्ज भरायचा हा एक वेगळा अनुभव आहे. आज मला अनेकांनी विचारले तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही. मला हे शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नाही म्हणत असताना लोक या ठिकाणी आले आहेत. माझा विजय निश्चित आहे. - पंकजा मुंडे, भाजपा नेत्या