मुंबई Nitesh Rane On Manoj Jarange : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर जहरी टीका केली होती. नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनी आमदार नितेश राणे यांना आवाहन केलं होतं. तसंच यापुढं टीका केल्यास सरळ पानउतारा करेल असा थेट इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला. यावरुनच आता भाजपा नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना राजकीय स्टेटमेंट करू नये असा सल्ला दिला आहे.
जरांगे यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नितेश राणे म्हणाले, " मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या हितासाठी लढत आहेत. सरकारकडून त्यांची फसवणूक होणार नाही. जरांगेंनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं." तसंच जरांगेंनी राजकीय स्टेटमेंट करू नये. आपण समाज बांधव म्हणून एकत्र काम करू. पंतप्रधान मोदींवर बोलल्यामुळं नारायण राणे तसं बोलले असल्याचा निर्वाळा नितेश राणे यांनी दिला आहे. तसंच जरांगे यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये हा मैत्रीचा सल्ला देत असल्याचंही सांगून या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
'राजकीय स्टेटमेंट करू नका', मनोज जरांगेंना नितेश राणेंचा सल्ला, नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर केली सारवासारव - मनोज जरांगेंना नितेश राणेंचा सल्ला
Nitesh Rane On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून आरक्षणात सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्यातील सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक असताना देखील उपोषणाला बसण्याची गरजच काय? असा सवाल सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि जरांगे पाटील यांच्यात शब्द युद्ध थांबायला तयार नाही. असं असतानाच आता मनोज जरांगेंनी राजकीय स्टेटमेंट करू नये असा सल्ला भाजपा नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
Published : Feb 16, 2024, 6:43 PM IST
काय म्हणाले होते नारायण राणे :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्यानं आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल."
ठाकरे गटावरही साधला निशाणा :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देत निलेश राणे म्हणाले की, "अचानक शेतकऱ्यांबद्धल राऊत आणि त्यांच्या मालकाला चिंता वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय. जे काँग्रेसला जमलं नाही. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही यांची सवय आहे."
हेही वाचा -