रत्नागिरी Narayan Rane On Rahul Ghandi : आम्ही संविधान बदलणार, असं विरोधी पक्ष खोटं सांगत फिरत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही दैवत मानतो. काँग्रेसनं 65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली, त्यावेळेला तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं, असा सवाल नारायण राणे यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधींना केलाय. तसंच हे एक नंबरचे खोटारडे असल्याची टीका यावेळी राणेंनी केली. हातखंबा इथं महायुतीचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते.
यांच्याकडं विरोधी पक्षनेता नाही : यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, "विरोधी पक्ष मोदींना तडीपार करायला निघाला आहे. आमचे 303 खासदार आहेत, आता 400 च्या पुढं जाणार आहोत. कोण विरोधी पक्ष समोर उभा आहे, काँग्रेसकडं 50 खासदार आहेत. विरोधी पक्ष नेता पण त्यांच्याकडं नाही. शरद पवार यांच्याकडं 3 खासदार, शिवसेना उद्धव गटाकडे 5 खासदार आहेत. सर्व विरोधक मिळून 55 खासदार आहेत, अरे आम्ही तीनशेच्या वर आहोत आणि हे आम्हाला तडीपार करायला निघाले आहेत."