जळगाव : मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुलाबराव पाटील हे देखील आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयावर आपली प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री पदासंदर्भात गुलाबराव पाटील काय म्हणाले? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाहीर केलं, "माझ्याकडून कोणतेही अडचण नाही. त्यामुळं त्यांच्या बाजूनं मुख्यमंत्री पदाचा विषय संपलेला आहे. आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. त्यामुळं आगामी काळात शिवसेना पक्ष जो काही निर्णय घेईल ते सर्व एकनाथ शिंदे घेतील".
आमचे नेते एकनाथ शिंदे : "आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळं ते जसा आदेश देतात त्याच पद्धतीनं आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचं काम केलय. त्यामुळं लोकांना ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावं हे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट सांगून टाकलं की, याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मोदी शाह यांच्याकडं असतील".
गुलाबराव पाटील ऑन ईव्हीएम : मी पण सहाव्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळं ज्या गावात मी मायनस राहील असं वाटत होतं. त्या गावात निकालानंतर बघितलं तर मी खरच मायनस होतो. विरोधकांकडून लहान मुलांप्रमाणे रडीचा डाव चाललेला आहे. निवडून आलं तर ईव्हीएम चांगलं आहे आणि पडलं तर ईव्हीएम खराब आहे, असं ते म्हणतात.
संजय राऊत यांनी शिवसेना संपवली : "संजय राऊत हे माणूस राहिलेले नाहीत. त्यांना दवाखान्यात दाखल केलं पाहिजे. आधी त्यांनी शिवसेना संपवली त्यानंतर उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता स्वतःही संपणार. संजय राऊत मेंटल झाले आहेत. त्यांच्या हातात दगड द्या, दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणून त्यांना सांगा", अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा -