मुंबई Chandrababu Naidu Meets Eknath Shinde :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अनौपचारिक आणि दोन्ही राजाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोन्ही राज्यासंदर्भात चर्चा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. चंद्रबाबू नायडू हे शनिवारी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मुंबईमध्ये आले आहेत.
मोदी सरकार कोसळू शकतं : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "चंद्रबाबू नायडू आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? चंद्रबाबू नायडू यांची ही एक शिष्टाचार भेट होती. हा एक शिष्टाचाराचा भाग आहे. महाराष्ट्र आणि चंद्राबाबू नायडू यांचे काही समीकरण नाही. इतर राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आपल्या राज्यात येतात. तेव्हा ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. परंतु चंद्राबाबू नायडू हे इंडिया आघाडी सोबत नसल्याकारणानं त्यांनी इतर कुणाची भेट घेतली नाही. नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. त्यांच्याकडे बहुमत नाही. मोदी सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या टेकूवर टिकलं आहे. देवानं जर त्यांना सद्बुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकतं," असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा
- बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-दिव्यांग नागरिकांची मागणी - Pooja Khedkar controversy
- अनंत अंबानी राधिका मर्चंट यांना पंतप्रधान मोदींनी दिले आशीर्वाद; विवाह सोहळ्यातील धार्मिक कार्याला हजेरी - Pm Modi In Anant Radhika Wedding
- विशाळगडाच्या अतिक्रमण मुक्तीसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल; पण उद्या गडावर जाणारच- संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार - Vishalgad Encroachment Issue
- महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता : वर्धा जिल्ह्यात राजकीय समीकरण बदललं, 'या' पक्षानं केला दावा - Mahavikas Aghadi