महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam - AMOL MITKARI ON RAMDAS KADAM

Amol Mitkari On Ramdas Kadam : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. 'अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते, तर चालले असते,' असं विधान करून रामदास कदम यांनी एकप्रकारे लोकसभेतील अपयशाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडलंय. आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलंय.

Amol Mitkari Reply to Ramdas Kadam
अजित पवार, अमोल मिटकरी आणि रामदास कदम (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 9:40 PM IST

मुंबई Amol Mitkari On Ramdas Kadam: बुधवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रामदास कदमांनी महायुतीच्या पराभवाला अजित पवारांना कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न केला. 'अजित पवार थोडे दिवस आले नसते, तर आम्हाला ९ मंत्रि‍पदे मिळाली असती, ते काही दिवस आले नसते तर चालले असते' अशी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली :"अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर, कमंडलू घेऊन गोसावी बनून हिमालयात जप करायला जावं लागलं असतं" दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, अशा शब्दांत मिटकरींनी कदम यांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं आता महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षात राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर आल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना त्यांच्या राजकीय विरोधकांप्रमाणे त्यांचे विद्यमान मित्र असलेल्या महायुतीतील घटकपक्षांनी देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केलाय.


युतीत मिठाचा खडा पडू नये :लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. प्रतिष्ठेच्या बारामती मतदारसंघात दस्तुरखुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक ऑर्गनायझरमध्ये अजित पवारांना भाजपानं सोबत घेण्याच्या कृतीवर टीका करण्यात आली होती. अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केल्याची टीका करण्यात आली होती. त्यातच आता शिवसेनेचे रामदास कदम यांनी देखील अजित पवारांच्या महायुतीतील समावेशावर टीका केल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळं मिटकरी यांनी कडक शब्दांत कदम यांच्या टीकेचा समाचार घेत त्यांना खडेबोल सुनावलं आहे. मिटकरी यांच्या या टीकेवर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपण यावर आता बोलणार नाही, योग्य वेळ आल्यावर बोलू असं स्पष्ट केलंय. आताही बोलता येईल मात्र, युतीत मिठाचा खडा पडू नये गप्प असल्याचं शिरसाट म्हणाले.



तिकीट वाटपात झालेला गोंधळ थांबवा: कदम यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना शिवसेनेला विधानसभेसाठी १०० उमेदवार मिळावेत अशी मागणी केली आहे. लोकसभेच्या तिकीट वाटपात झालेला गोंधळ थांबवा, नाहीतर मला सोबत घेऊन चला असं आवाहन त्यांनी शिंदेना केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी, शाह यांच्याकडं १०० जागा मागाव्यात त्यातील ९० आपण निवडून आणले नाही तर तुम्ही सांगाल ते करु असा निर्धार व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET
  2. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा: उद्धव ठाकरेंचं पारडं जड, समाजवादी पक्षाच्या आशाही उंचावल्या - Assembly Election 2024
  3. रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये, थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस - Ravindra Waikar

ABOUT THE AUTHOR

...view details