कोल्हापूर : 'लाडकी बहीण योजने'वरुन भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप विरोधकांनी केला. "महाडिक यांनी महिलांना धमकी दिला. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी खासदार महाडिक यांच्या प्रचारावर बंदी घालावी," अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं मुख्य निवडणूक आयोगाकडं करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी दिली. राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी थेट कोल्हापुरात येऊन खासदार महाडिक यांच्या विरोधात आव्हान दिल्यामुळं खासदार महाडिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपींना सत्तेचं संरक्षण : "बदलापूर घटनेत आरोपीला फास्टट्रॅक कोर्टात हजर करून शिक्षा व्हायला हवी होती, मात्र तसं झालं नाही. कोल्हापुरातील एका गावातही अशाच पद्धतीचा अत्याचार झाला होता. या घटनेतील आरोपी पोलिसांसोबत दोन महिने फिरत होते. यामुळं महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सत्तेचं संरक्षण मिळतं का?," असा सवाल अलका लांबा यांनी केलाय.
प्रतिक्रिया देताना अलका लांबा (ETV Bharat Reporter) भाजपावर हल्लाबोल :"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाही विरोधात बोलतात. लोकसभा निवडणुकीत देशातील स्वाभिमानी महिलांनी या नेत्यांना जागा दाखवली, सत्तेची दहा वर्ष हा खूप मोठा काळ आहे. या काळात सत्तेत असलेल्यांना लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेने प्रश्न विचारायला हवेत," असेही अलका लांबा यावेळी म्हणाल्या.
खासदार महाडिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करा :"खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी अलका लांबा यांनी केली. "महिलांना जाहीर धमकावणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत भाजपा चालढकल करत आहे," असा आरोपही त्यांनी केला. "खासदार महाडिक यांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील जनतेत प्रचंड रोष आहे आणि तो राग येत्या विधानसभा निवडणुकीत मतपेटीतून दिसेल," असं लांबा यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- वरळीकरांसाठी काय केलं? मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- एकहाती झेंडा रोवणारा मतदारसंघ राखण्याचं भाजपापुढं कडवं आव्हान
- महाराष्ट्रातील मुस्लिम, दलितांचे मत परिवर्तन करण्यात किरण रिजीजू यशस्वी होतील का? टक्केवारी काय सांगते?