महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'बिहार पॅटर्न'ची चर्चा धादांत खोटी, यात तसूभर देखील सत्य नाही; अजित पवारांची प्रतिक्रिया - Ajit Pawar Amit Shah

Ajit Pawar Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. 'लालबागचा राजा' दर्शनाचं निमित्त असलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट फार महत्त्वाची आहे. तर राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची चर्चा सुरू आहे. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

Ajit Pawar And Amit Shah
अजित पवार आणि अमित शाह (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 4:14 PM IST

पुणे Ajit Pawar Amit Shah :विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडं केली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता अजित पवार यांनी खुद्द माहिती दिली आहे.

बिहार पॅटर्न बाबतची चर्चा खोटी :अजित पवार म्हणाले, "ज्याबाबत तुम्ही विचारत आहे त्याबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्यात अशी काहीही चर्चा झालेली नाही. अमित शाह हे मुंबईत आले असताना मी त्यांची भेट घेतली. परंतु सध्या राज्यातील कापूस, सोयाबीन प्रश्न, कांदा निर्यात बंदी, अशा विविध प्रश्नाच्याबाबत मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं. जी काही बिहार पॅटर्नची चर्चा सुरू आहे ती धादांत खोटी असून यात तसूभर देखील सत्य नाही". उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील हडपसर येथील हांडेवाडी येथील प्रभू श्रीराम मंदिराला भेट देत त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV BHARAT Reporter)

विधानसभा निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार : राज्यात अनेक मतदार संघात महायुतीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर अजित पवार म्हणाले की, असं काहीही होणार नाही. महायुतीमधील सर्वजण एकत्र बसून 288 जागा कोणकोणत्या घटक पक्षाला द्यायचं ते ठरणार आहे. आमचं महायुतीचं बरचसं ठरलं आहे. बाकीचं काही अजून ठरायचं आहे.

आमचं लक्ष योजनेकडे :पवार गटाकडून सांगण्यात येत आहे की, तुमच्या पक्षाला स्वतंत्र लढविण्यात येणार आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, ज्यांनी सांगितलं आहे त्यांनाच विचारा मी कधीही असं बोललो नाही. सध्या आमचं लक्ष हे ज्या योजना आम्ही आणल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहचवायचं आहे. त्याचा फायदा लाभार्थी यांना द्यायचं आहे.


माझे फोटो तिथं लावू नका :भाजपाकडून तुमचं फोटो लावण्यात आलेलं नाहीत याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मीच त्यांना सांगितल की माझे फोटो तिथं लावू नका. कारण माझे फारच फोटो सगळीकडं लागले आहेत. तसंच लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आहे. महायुतीमध्ये घटक पक्ष आपल्या परीने ते मांडण्याचा प्रयत्न करतील.



सगळ्यांना आमदार व्हायचं आहे: बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची स्वाभिमान यात्रा सुरू होत आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, मला काहीही घेणंदेणं नाही. जो तो आपापल्या पद्धतीने संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही देखील महायुती वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. आता तर तिसरी आघाडी देखील आली आहे. चौथी आघाडी देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. तरुणांना वाटत आहे की, माझी पहिली संधी आहे ती जाता कामा नये, तर वयस्कर लोकांना वाटत आहे की, माझी शेवटची संधी आहे ती देखील जाता कामा नये आणि मधले म्हणत आहे आम्ही किती दिवस लोंबकळायचं असं चाललं आहे.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते - अनिल देशमुख - Anil deshmukh On Devendra Fadnavis
  2. "देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे अमित शाहांना..."; जयंत पाटलांचा हल्लाबोल - Jayant Patil on BJP
  3. राज्यात 'इतक्या' जागा जिंकण्याचा भाजपाचा संकल्प; अमित शाहांनी घेतली भाजपा कोअर कमिटीची बैठक, महायुतीचा मेगाप्लॅन ठरला - Amit Shah Mumbai Visit

ABOUT THE AUTHOR

...view details