महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बँक खाती गोठवल्याप्रकरणी काँग्रेसचा थयथयाट; कोर्टात मिळाला दिलासा, बुधवारपर्यंत मुदतवाढ - काँग्रेसचे बॅंक खाते गोठावले

Congress Bank Account Freeze : काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर आरोप करत पक्षाची बॅंक खाती गोठवण्यात आल्याची माहिती दिली होती. आता या प्रकरणी काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

Ajay Maken
Ajay Maken

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 1:33 PM IST

नवी दिल्ली Congress Bank Account Freeze :काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पक्षाची खाती गोठवण्यात आल्याची माहिती दिली होती. आता काँग्रेसला आयटी न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी बुधवारपर्यंत उठवण्यात आल्याचं पक्षाचे नेते विवेक तन्खा यांनी सांगितलं.

बुधवारपर्यंत खाती वापरता येणार : तन्खा यांनी सांगितलं की, "मी नुकतीच काँग्रेसची बाजू दिल्लीतील आयटीएटी खंडपीठासमोर मांडली. आम्ही म्हणालो की आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्हाला शिक्षा होऊ शकत नाही. आमच्यावर 115 कोटी रुपयांचा कर कसा लावला जातो यावर चर्चा करायची आहे. सुनावणीनंतर न्यायालयानं आम्हाला दिलासा दिला असून आता काँग्रेस पक्ष बँक खाती वापरू शकतो. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे."

बॅंक खाती गोठवल्याचा आरोप :अजय माकन यांनी शुक्रवारी सकाळीकेंद्र सरकार आणि भाजपावर अनेक गंभीर आरोप केले होते. अजय माकन म्हणाले की, काँग्रेसची सर्व प्रकारची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ते म्हणाले की, प्राप्तीकर विभागानं 210 कोटींच्या वसुलीची मागणी केली आहे. युवक काँग्रेसचे बँक खातेही गोठवण्यात आल्याचा आरोप माकन यांनी केला. देशात काँग्रेसची खाती गोठवली गेली नाही तर लोकशाही गोठवल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीला काही अवधी शिल्लक असताना काँग्रेसची खाती का गोठवली?, असा सवाल अजय माकन यांनी उपस्थित केला होता. "काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून 210 कोटींची वसुली सुरू आहे. हा जनतेने दिलेला पैसा आहे, श्रीमंतांचा पैसा नाही", असं ते म्हणाले.

खर्च करण्यासाठी पैसा नाही : अजय माकन म्हणाले की, "आयकर विभागानं काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली. हा ऑनलाइन क्राउड फंडिंगमार्फत गोळा केलेला पैसा आहे." दुसरीकडे, भाजपाकडे निवडणूक रोख्यांचा संपूर्ण पैसा आहे आणि तो ते खर्च करत असल्याचा आरोप माकन यांनी केला. अजय माकन म्हणाले की, "सध्या आमच्याकडे खर्च करण्यासाठी, वीज बिल भरण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. याचा काँग्रेसच्या न्याय यात्रेवरच नव्हे तर सर्वच राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे."

हे वाचलंत का :

  1. रायबरेली मतदारांना सोनिया गांधींचे भावनिक पत्र, काय आहे राजकीय अर्थ?
  2. भाजपासह तृणमूलकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर, वाचा कोणते दिग्गज असणार निवडणुकीच्या रिंगणात?

ABOUT THE AUTHOR

...view details