अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 8.40 च्या सुमारास नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या अर्थ मंत्रालयात पोहोचल्या.. यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त विभागाचे इतर उच्चपदस्थ अधिकारी निर्मला सीतारामन यांच्यासोबत उपस्थित होते.. पंकज चौधरी म्हणाले. "पंतप्रधान मोदींचा मंत्र आहे - सबका साथ सबका विकास... हा अर्थसंकल्पही त्याप्रमाणे असेल.". अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन त्यांच्या टीमसोबत संसदेत पोहोचल्या.. हा अर्थसंकल्प भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा रोडमॅप असल्याचं मानलं जातय.. अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो. तरुण. शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाऊ शकतं.. निर्मला सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजचा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळापत्रकानुसार 12 ऑगस्ट रोजी संपेल.. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा लूक आणि अर्थसंकल्प यांचं कनेक्शन दरवर्षी पाहायला मिळतं. प्रत्येक बजेटमध्ये त्यांच्या साडीचे रंग बदलतात.