अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.. प्रार्थना सरोज खानच्या ग्रुपमध्ये अभिनेत्री होण्याआधी काम करायची.. प्रार्थना 'पवित्र रिश्ता' या हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये वैशाली नावाच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.. याशिवाय ती 'नाईनएक्स झकास' हिरोईन हंट सीझन 1 ची विजेती आहे.. प्रार्थनानं 'रीटा' या मराठी चित्रपटातून 2009 मध्ये करिअरला सुरुवात केली.. 2010 मध्ये आलेल्या 'माय लेक' या मराठी चित्रपटात तिनं लीलावती नावाचं पात्र साकारलं होतं.. यानंतर ती 2011 मध्ये 'बॉडीगार्ड'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.. प्रार्थनानं 2013 मध्ये 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या चित्रपटात पंजाबी मुलगी जसपिंदर कौरची साकारली होती.. प्रार्थनानं 2021मध्ये झी मराठीच्या 'माझी तुझी रेशमगाठ' या मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारून अनेकांच मन जिंकले.. प्रार्थनानं चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक जावकरशी नोव्हेंबर 2017 मध्ये गोव्यात लग्न केलं.. सध्या प्रार्थना कुटूंबाबरोबर चांगला वेळ घालवताना दिसत आहे.. प्रार्थना इंस्टाग्राम अकाउंटवरून अनेकदा आपल्या चाहत्यांबरोबर फोटो शेअर करत असते.