पूजाला लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती.. पूजानं 2009 च्या मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता. पण तिला यामधून बाहेर पडावे लागले.. पूजानं पुन्हा एकदा 2010च्या मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला.. या स्पर्धेत तिनं सेकंड रनर अपचा किताब पटकावला.. या विजयानंतरच पूजा हेगडेनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.. पूजा हेगडे 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'मुगामुदी' या चित्रपटात पहिल्यांदा दिसली.. पूजाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.. या चित्रपटानंतर तिला साऊथ इंडस्ट्रीत ओळख मिळू लागली.. यानंतर पूजाला 'मोहन जो दारो' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळली.. 'मोहन जो दारो' या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.. 'मोहन जो दारो' चित्रपटात तिच्याबरोबर हृतिक रोशन होता.. याशिवाय ती 'किसी का भाई किसी का जान'मध्ये सलमान खानबरोबर दिसली आहे.