महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

पावसाळ्यात तोंडाला पाणी आणणारे झणझणीत स्नॅक्स खा... - mouth watering snacks

आता पावसाळा आला आहे. पावसाचा आवाज, सुसाट वारा आणि ओलाव्यात गरम पेये आणि स्वादिष्ट काही पदार्थ खाण्याची इच्छा यावेळी होते. विविध प्रकारचे भजी, समोसे आणि चविष्ट भेळ घेऊन पावसाचा आनंद घेऊ शकता. बाल्कनीतून पावसाकडे पाहत असताना तुम्ही गरमागरम भजी खाऊ शकता. (ANI- Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 2:58 PM IST

पावसाळ्यासाठी चहा आणि बटाटा वडा हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. पावसाळ्यातील हा एक उत्तम नाश्ता आहे. (ANI- Photo)
पावसाळ्यात नाश्त्यासाठी योग्य पर्यात समोसा आहे. झटपट समोसे बनवून तुम्ही चहाबरोबर याचा आनंद घेऊ शकता. (ANI- Photo)
कणीस किंवा भुट्टा हा मीठ आणि मिरची पावडर घालून, निखाऱ्यावर भाजून घ्या. हा स्मोकी फ्लेवर्ड नास्ता तुमची संध्याकाळ अधिक सुखद बनवेल. (ANI- Photo)
आलू टिक्की चाट : आलू टिक्की, दाल आलू टिक्की आणि कुरकुरे आलू टिक्की एकत्रित करून घ्या. यानंतर यावर कांदा आणि कोथिंबर टाकून सर्व्ह करा. (ANI- Photo)
कचोरी हा पदार्थ हा अनेकांना आवडतो. हा चवदार पदार्थ बनवून तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता. (ANI- Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details