महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'क्वीन' कंगना रणौतचे फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 5:36 PM IST

कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानमुळे कायमचं चर्चेत असते. ती हिंदी चित्रपटसृष्टीपासून तर सामाजिक आणि राजकारणापर्यंतच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडताना दिसते. कंगनाला अनेकदा तिच्या विधानामुळे ट्रोल केले जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
कंगनाच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिनं डॉक्टर व्हावं. पण आई-वडिलांशी भांडण झाल्यावर ती दिल्लीत आली.
कंगनानं वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलमध्ये हात आजमावला.
आज कंगनाच्या प्रत्येक निर्णयावर तिचे कुटुंबीय खूश आहेत.
कंगना ही अशी अभिनेत्री आहे जिला तिच्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
कंगनानं 2006 मध्ये 'गँगस्टर' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
हिंदी चित्रपटसृष्टीत करण जोहर, हृतिक रोशन, सुमन, आदित्य पांचोली, अपूर्व असरानी असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर कंगनानं मोठे आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
कंगना रनौत आणि हृतिक रोशननं 2013 मध्ये 'क्रिश 3' मध्ये काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
2016 मध्ये एका मुलाखतीत कंगनानं हृतिक रोशनला तिचा एक्स-बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं.
कंगनानं निर्माता करण जोहरला 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये बॉलिवूड माफिया म्हटलं होत.
कंगना करणच्या शोमध्ये गेली तेव्हा, तिनं त्याच्यावर घराणेशाही करत असल्याचा आरोप केला होता.
कंगनानं आता साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
कंगना अनेकदा आपले मत सोशल मीडियावर मांडत असते.

ABOUT THE AUTHOR

...view details