जेनिफरनं 2000 साली 'शाका लाका बूम बूम' मधून बालकलाकार म्हणून छोट्या पडद्यावर प्रवेश केला.. जेनिफरनं 2009मध्ये 'कसौटी जिंदगी की'. 'संगम' आणि 'कहीं तो होगा' सारख्या मालिकांमध्ये काम केलं.. जेनिफर पहिल्यांदा 'दिल मिल गए' द्वारे प्रकाशझोतात आली.. 'दिल मिल गए' ही मालिका सुपरहिट ठरली. यानंतर तिला अनेक मालिकेचे ऑफर्स मिळू लागले.. 'दिल मिल गए' या मालिकेतील तिची जोडी करण सिंग ग्रोवरबरोबर होती.. करण सिंग ग्रोवर आणि जेनिफर यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडली.. जेनिफर आणि करण या मालिकेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.. त्यांचं नात फार काळ टिकू शकले नाही आणि दहा महिन्यांनंतर त्यांचं लग्न मोडलं.. यानंतर करणनं त्याच्या पहिल्या चित्रपटातील अभिनेत्री म्हणजेच बिपाशा बसूशी लग्न केलं.. जेनिफरचा घटस्फोट झाल्यानंतर तिनं तिच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केले.. जेनिफर विंगेटला 'बेहद'. 'बेपन्ना' आणि 'सरस्वतीचंद्र' या टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाते.. आज तिचा समावेश टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे.