परिणीती चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात शिक्षित स्टार्सपैकी एक आहे.. परिणीतीनं इंग्लंडच्या मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स. बिझनेस अँड इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स पदवी मिळवली आहे.. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिणीती चोप्रानं दीर्घकाळ परदेशातही काम केलं. 2009 मध्ये ती भारतात परतली.. मंदीमुळे तिची नोकरी गेली होती. यानंतर तिनं यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग विभागात काम केलं.. 'बँन्ड बाजा बारात' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याची इच्छा झाली.. यानंतर परिणीतीनं यशराज फिल्म्समधील नोकरी सोडली आणि अभिनय शिकण्यासाठी ॲक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश केला.. परिणीतीनं २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लेडीज वर्सेस रिक्की बहल' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.. त्यानंतर ती 'शुद्ध देसी रोमान्स'. 'हसी तो फसी' या चित्रपटांमध्ये दिसली.. परिणीतीनं शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहे.. 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये परिणीती चोप्रानं आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढासोबत लग्न केलं.. परिणीती लग्नानंतर 'मिशन राणीगंज' या चित्रपटात दिसली होतीय. 'मिशन राणीगंज'मध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसला.