ETV Bharat / entertainment

ख्रिसमसचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पाहू शकता 'हे' 5 चित्रपट - 5 FILMS

25 डिसेंबर रोजी ख्रिसमस उत्सव साजराला केला जात आहे. आता या विशेष दिवशी तुम्ही हे 5 सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहू शकता.

christmas
ख्रिसमस (christmas (Film Posters))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई : प्रत्येक वर्षाचा ख्रिसमस सण संपतो आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची सुरुवात होते. ख्रिसमसच्या निमित्तानं प्रत्येकजण नवीन भेटवस्तू आणि मिठाईंबद्दल उत्सुक असतात. आता तुम्ही ख्रिसमसचा दिवस आणखी सुंदर बनवू शकता. आम्ही काही तुम्हाला सुचवलेले चित्रपट तुम्ही पाहून ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता.

1. मेरी ख्रिसमस : अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ अभिनेता विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात ख्रिसमसच्या रात्री दोन अनोळखी व्यक्ती भेटतात. यानंतर ही रोमँटिक रात्र लवकरच भयानक स्वप्नात बदलते. कारण काही तासांतच चित्रपटाचा नायक हा एका खुनप्रकरणी अडकतो. या चित्रपटात विजय आणि कतरिनाशिवाय संजय कपूर आणि राधिका आपटे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

2. द स्काई इज पिंक : 'द स्काय इज पिंक' चित्रपट हा भावनांनी भरलेल्या रोलर कोस्टर राईडवर तुम्हाला नक्कीच घेऊन जाईल. या चित्रपटात एका जोडप्याची कहाणी दाखविण्यात आली आहे. हे जोडपे आपल्या मुलीला एका भयानक आजारातून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना यात दिसतात. मात्र जीवनाच्या या धक्क्यांमध्ये, हे कुटुंब त्यांचा आनंद शोधतात आणि ख्रिसमसचा आनंद घेतात. या चित्रपटात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, झायरा वसीम आणि रोहित सराफसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

3. अंजाना-अंजानी : 'अंजाना-अंजानी' रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय. या चित्रपटात रणबीर आणि प्रियांका नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एकमेकांना भेटतात. या दरम्यान कहाणीत एक ट्विस्ट येतो, दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील समस्यांमुळे आत्महत्या कराण्याची इच्छा होत असते. यानंतर पुढच्या 20 दिवसात ते त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवासाला निघतात आणि त्याच दरम्यान ते दोघेही प्रेमात पडतात.

4. बडा दिन : 'बडा दिन' हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, जो एका अनोख्या कहाणीसह ख्रिसमसचे सार कॅप्चर करते. 'बडा दिन' हे शीर्षक ख्रिसमसच्या दिवसासाठी आहे. हा चित्रपट कोलकातावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कहाणीमध्ये एक अंडरवर्ल्ड डॉन, त्याच्याच टोळीतील एका सदस्याच्या कुटुंबाला धमकवतो कारण त्यानं त्याचा विश्वासघात केला. या चित्रपटात मार्क रॉबिन्सन, शबाना आझमी आणि तारा देशपांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

5. इट्स अ वंडरफुल लाइफ : 'इट्स अ वंडरफुल लाईफ' हा एक अमेरिकन ख्रिसमस सुपरनैचुरल ड्रामा आहे, जो एका शॉर्ट स्टोरी आणि बुकलेट द ग्रेटेस्ट गिफ्टवर आधारित आहे. फ्रँक कॅप्राचा एक क्लासिक जो आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट ख्रिसमस चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाची कहाणी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुरू होते, जिथे न्यूयॉर्कमधील जॉर्ज बेली आत्महत्या करण्याचा विचार करतात. यानंतर एक देवदूत त्याला सांगतो की, तो महान माणूस आहे. त्यानं आपल्या समाजासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत. जेम्स स्टीवर्ट, डोना रीड, हेन्री ट्रॅव्हर्स, लिओनेल बॅरीमोर या कलाकारांनी यात सुंदर अभिनय केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.