हैद्राबाद : २५ डिसेंबरला जगभरात 'ख्रिसमस' (Merry Christmas 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी मित्र-मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. खरंतर, येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून 'ख्रिसमस' साजरा केला जातो. बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे. या दिवशी ख्रिसमस बांधव चर्चेमध्ये जाऊन प्रार्थना करतात.
ख्रिसमसचा इतिहास : ख्रिसमसचा इतिहास प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. त्यामुळं याच दिवशी ख्रिसमस (नाताळ) सण साजरा केला जातो. परंतु, काही जाणकारांच्या मते, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला नव्हता, तो त्यांचा केवळ प्रतिकात्मक वाढदिवस आहे. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. जोसेफ तसंच मेरी यांच्या पोटी येशूचा जन्म झाला होता. मेरीला एक स्वप्न पडलं होतं. ज्यामध्ये तिनं प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती, असा दावा त्यांचे अनुयायी करतात. रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस यांच्या मते, आईनं केलेल्या भविष्यवाणीनंतर प्रभु येशू बरोबर 9 महिन्यांनंतर 25 डिसेंबर रोजी पृथ्वीवर जन्माला आले. त्यामुळं 25 डिसेंबर हा 'ख्रिसमस डे' म्हणून ओळखला जातो.
कोण आहे सांताक्लॉज? : सांताक्लॉज यांना संत निकोलस, क्रिस क्रिंगल, फादर ख्रिसमस अशा विविध नावांनी ओळखलं जातं. त्यांचा जन्म 280 च्या सुमारास तुर्कीमध्ये झाला होता. संत निकोलस हे चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू भक्तांना भेटवस्तू देत असत. सांताक्लॉजची आधुनिक संकल्पना त्यांच्यापासूनच निर्माण झाली असावी, असं मानलं जातं. ते सुरुवातीला ख्रिश्चन चर्चमध्ये बिशप होते. त्यांचा छळ करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. सेंट निकोलस यांनी त्यांची सर्व वारसाहक्क संपत्ती दान केली होती. याशिवाय आपल्या कमाईतून ते ग्रामीण भागात फिरुन गरीब, आजारी लोकांना मदत करत असत. संत निकोलस यांची मुलांचे आणि खलाशांचे रक्षक म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळं सेंट निकोलस 'डे' त्यांच्या सन्मानार्थ 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश, डच संस्कृतींमध्ये उदयास आलेली "सांता क्लॉज" ही संकल्पनाही तिथूनच उद्भवली असावी असं इतिहासकारांचं मत आहे.
(टीप : सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' दावा करत नाही)
हेही वाचा -
यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व