अदिती राव हैदरीनं अनेकदा राजकुमारीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली आहे.. अदिती खऱ्या आयुष्यातही एक राजकुमारी आहे.. तिचा संबंध राजघराण्याशी आहे.. अदिती राव हैदरीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे प्रधानमंत्री होते.. याशिवाय तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे देखील आसामचे राज्यपाल राहिले आहेत.. आदितीची आई राजघराण्यातील होती. तिचे आजोबा रामेश्वर राव हे वानपर्थी. तेलंगणाचे राजा होते.. अदितीला लहानपणीच तिच्या आई-वडिलांपासून वेगळे होण्याचे दुःख सहन करावे लागले.. अदितीच्या आई-वडिलांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा ती फक्त दोन वर्षांची होती.. अदितीनं 2006 मध्ये मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 'दिल्ली 6' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता.. तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत 'रॉकस्टार'. 'मर्डर 3'. 'बॉस'. 'वजीर'. 'खूबसूरत' आणि 'फितूर' इत्यादी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.. अदितीनं 2009 मध्ये लपून लग्न केलं.. 2013 मध्ये तिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला.