महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

मान्सूनच्या हंगामात त्वचेला चमकदार बनवण्यासाठी करा 'या' गोष्टी - skincare tips

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 3:21 PM IST

पावसाळ्यामधील हवामान हे त्वचेसाठी आव्हानात्मक असू शकते. या ऋतूमध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर तेलकटपणा येत असतो. तुम्हाला तुमची त्वचा आणि तिच्यासाठी आवश्यक असलेली काळजी समजून घेणे आवश्यक आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, ती ताजी आणि सुंदर ठेवण्याची आम्ही तुम्हाला स्किनकेअर रूटीन सांगणार आहोत. (ANI - photo)
पावसाळ्यात तुमच्या त्वचेवर घाण जमा होऊ शकते. एक सौम्य क्लिनर तुमच्यासाठी आवश्यक आहे. (ANI - photo)
पावसाळ्यात, तुमच्या त्वचेला मुरुमांपासून आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून वाचवण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे. (ANI - photo)
तुम्हाला तेलकट आणि चिकट चेहरा वाटत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मॉइश्चरायझ करू नये, नियमित मॉइश्चरायझ करा. (ANI - photo)
त्वचेवर सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये. यामुळे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण होते. (ANI - photo)
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमची त्वचा एक्सफोलिएट केल्यानं त्वचेच्या मृत पेशी आणि जमा झालेली घाण निघते. (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details