महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 1:07 PM IST

Updated : May 6, 2024, 3:45 PM IST

ETV Bharat / photos

उन्हाळ्यात फॉलो करा बॉलिवूड सेलिब्रिटींची स्टाईल स्टेटमेंट - INSPIRED OVERSIZED OUTFITS

उन्नहाळ्यात फॅशनचा विचार केला तर बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या अनोख्या स्टाइल स्टेटमेंटनं ट्रेंड सेट करतात. आता ओव्हरसाईज आउटफिट्स अनेकजण घालताना दिसतात. दरम्यान पाच बॉलिवूड स्टार्सचे आपण आज आउटफिट्स पाहणार आहोत, जे तुम्ही वापरून स्टाईलिश दिसू शकता. (Instagram- ANI)
बॉलिवूडची कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान अनेकदा ओव्हरसाईज आउटफिट्स घालताना दिसते. तिचा निळा बहु-रंगीत ओव्हरसाईज कुर्ता हा खूप आकर्षक लुकसाठी योग्य पर्याय आहे. (Instagram- ANI)
दीपिका पदुकोण तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिनं ओव्हरसाईज शर्टसह निळ्या डेनिम जीन्स आणि स्नीकर्स परिधान केले आहेत. (Instagram- ANI)
करीना कपूरचा फॅशन सेन्स खूप जबरदस्त आहे. तिनं व्हायरल होत असलेल्या फोटोत निळ्या शॉर्टसह पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईज शर्ट घातला आहे. (Instagram- ANI)
अभिनेत्री हुमा कुरेशीनं घातलेला ड्रेस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य पर्याय ठरू शकतो. तिनं पोपटी रंगाचा जंपसूटसह ट्रेंडी लुकसाठी स्नीकर्स घातले आहे. (Instagram- ANI)
आलिया भट्ट तिच्या बहु-रंगीत ओव्हरसाइज को-ऑर्डर सेटसह परिपूर्ण समर लूकमध्ये खूप देखणी दिसत आहे. (Instagram- ANI)
Last Updated : May 6, 2024, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details