बुलावायो 600 Plus Total in Test Matches : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून त्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. हे दोन्ही सामने दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023-25 सायकलचा भाग नाहीत. या सामन्यात अफगाणिस्तानसाठी फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि तीन खेळाडूंनी शतकं झळकावली, त्यापैकी रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी तर द्विशतकं झळकावली.
MATCH DRAWN! 🚨
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 30, 2024
The first test match between Zimbabwe and Afghanistan has been drawn. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/JLd5QKuzWe
अफगाण संघानं उभारला 699 धावांचा डोंगर : अफगाणिस्ताननं या सामन्यात केवळ एक डाव खेळला आणि त्यात तब्बल 699 धावा केल्या. रहमत शाह (234 धावा), हशमतुल्ला शाहिदी (246 धावा) आणि अफसर झाझाई (113 धावा) यांनी संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळाडूंमुळंच अफगाणिस्तान संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. अफगाणिस्ताननं आतापर्यंत फक्त 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि इतके कमी सामने खेळूनही संघानं प्रथमच 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
𝐀 𝐍𝐞𝐰 𝐇𝐢𝐠𝐡 𝐟𝐨𝐫 𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐢𝐬𝐭𝐚𝐧! 📈
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 30, 2024
Afghanistan's first-inning total of 699 runs against Zimbabwe in the first Test match is now their highest total in an inning of a Test match. 🙌#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Sk8ODGNYNX
पाकिस्तानी संघाचा विक्रम मोडला : अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. अफगाणिस्तान संघ सर्वात कमी कसोटी सामने खेळून प्रथमच 600 हून अधिक धावा करणारा संघ बनला आहे. त्यांनी फक्त 10 कसोटी खेळल्या आहेत. यापूर्वीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानी संघानं 1958 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 8 विकेट गमावत 657 धावा केल्या होत्या. हा पाकिस्तानचा कसोटी क्रिकेटमधील 19 वा सामना होता.
The visiting batters were in 🔝 shape in the #ZIMvAFG Boxing Day Test 👏
— ICC (@ICC) December 30, 2024
📸: Afghanistan Cricket | 📝: https://t.co/tOKeFYhmeb pic.twitter.com/ad2bJBzTuH
ज्या संघांनी कमीत कमी कसोटी सामने खेळून त्यांचा पहिला 600 पेक्षा जास्त स्कोअर केला :
- अफगाणिस्तान - 10 कसोटी सामने
- पाकिस्तान - 19 कसोटी सामने
- वेस्ट इंडिज - 27 कसोटी सामने
- श्रीलंका - 75 कसोटी सामने
- बांगलादेश - 76 कसोटी सामने
A high-scoring game of Test cricket ends in a stalemate 🤝
— ICC (@ICC) December 30, 2024
📸: Zimbabwe Cricket#ZIMvAFG 📝: https://t.co/pRA04QCOMy pic.twitter.com/4jM9Lj4l7w
अल्लाह गझनफरनं घेतले तीन बळी : या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघानं 586 धावांची मोठी धावसंख्या उभारली. संघाकडून क्रेग इर्विन, सीन विल्यम्स आणि ब्रायन बेनेट यांनी शतकं झळकावली. तर बेन कुरननं अर्धशतक झळकावलं. अफगाणिस्तानकडून अल्लाह गझनफरनं सर्वाधिक तीन बळी घेतले.
𝐃𝐎𝐔𝐁𝐋𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃! 💯💯
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 30, 2024
Skipper @Hashmat_50 has followed @RahmatShah_08's footsteps by scoring an impressive double hundred in the ongoing Test match against Zimbabwe. 🙌
A solid, solid knock from the skipper to get into his second double-hundred in Test cricket. 👏… pic.twitter.com/KIIDsEK1Tv
अफगाणिस्ताननं उभारली हिलालयासारखी धावसंख्या : यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी फलंदाजीचं उत्कृष्ट उदाहरण सादर करत 699 धावांची हिमालयीन धावसंख्या उभारली. ब्रायन बेनेटनं झिम्बाब्वेसाठी पाच विकेट्स नक्कीच घेतल्या, पण बाकीचे गोलंदाज फ्लॉप ठरले. त्यानंतर झिम्बाब्वे संघानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 146 धावा केल्या. यानंतर पाच दिवस पूर्ण झाले आणि सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा :