हैदराबाद Surge In Terrorism In JK :मागील काही महिन्यांपासून जम्मू खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या जवानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जम्मू कश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यामुळे राजकीय आणि सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. सरकार आणि सुरक्षा दलांवर त्यामुळे दबाव आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायात आता घट होत असली, तरी काश्मीरमधला दहशतवाद संपला असं नाही, मात्र सध्या तो आटोक्यात आला इतकंच.
सुरक्षा दलाचे जवान तैनात नसलेल्या परिसरात वाढला दहशतवाद :पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद जम्मू काश्मीरमध्ये भारताला भेडसावत आहे. मात्र हा दहशतवाद प्रायोजकांना होणारा खर्च अडवल्याशिवाय थांबू शकत नाही. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रात कोणताच समान आधार नसल्यामुळे चर्चेनं कधीच तोडगा निघणार नाही. त्यामुळे सुरक्षा दलांचे जवान तैनात असलेल्या प्रदेशातून दहशतवाद कमी झाला आहे. तर सुरक्षा दलाचे जवान तैनात नसलेल्या परिसरात दहशतवाद वाढला. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून जम्मू खोऱ्यात वाढलेल्या दहशतवादाचं महत्वाचं कारण आहे. दहशतवादी त्यांना फायदा होणाऱ्या भूभागाची निवड करुन हल्ला करतात. यात नियंत्रण रेषेची (LOC) जवळच्या घनदाट जंगलातील गुहा लपण्याचं ठिकाण म्हणून दहशतवाद्यांना अनुकूल आहे. अशा भूप्रदेशात लाइव्ह इनपुट देणाऱ्या ड्रोनसारख्या फोर्स मल्टीसप्लायर्सची मर्यादित उपयुक्तता असते. जंगलात दृश्यमानता मर्यादित राहते. काही समर्थक असल्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा आणि विचारधारेनं प्रभावित आहेत. दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालींबाबत मार्गदर्शन, रसद आणि आगाऊ माहिती पुरवतात. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांसाठी ऑपरेशन्स आव्हानात्मक बनवते.
परिस्थिती सुधारल्यानं AFSPA उठवण्याचा विचार :नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकात मोठ्या प्रमाणावर राजकीय विधानं झाली. परिस्थिती त्या पातळीवर सुधारली आहे. सरकार काही परिसरातील AFSPA (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट) उठवण्याचा विचार करत होतं. राष्ट्रीय रायफल बटालियनमधील काही सैन्याच्या कंपन्यांचा आकार कमी केल्या जाऊ शकतात, अशी अफवा होती. मात्र हे घाईघाईनं केलेलं मूल्यांकन होतं. लडाखमधील घुसखोरीनंतर दहशतवाद कमी झाला आहे. त्यामुळे जम्मू सेक्टरमधील काही सैन्य तिकडं पाठवण्यात आलं, मात्र हा घाईचा उपाय होता. बाहेर गेलेल्यांना परत आणलं जाणार नसलं तरी आता अतिरिक्त फौजा तैनात केल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरातील दहशतवादाकडं व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. दहशतवादामुळे जम्मू काश्मीरची परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी संयम आवश्यक आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोणतंही ऑपरेशन राबवण्यात घाई करता येत नाही. दहशतवादाशी मुकाबला करताना नागरिकांची जीवितहानी होण्याचा धोका अधिक असतो. सुरक्षा दलाचं बळ वापरुन दहशतवादविरोधी कारवाया करता येत नाहीत. इंटेलिजन्स ग्रिडची स्थापना, भूप्रदेशाचं वर्चस्व आणि अथक प्रयत्न यामुळे गेम बदलू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला प्रशिक्षित आणि परिचित होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे जीवितहानी कमीत कमी होईल, याची खात्री येईल. इंटेलिजन्स ग्रिड पुन्हा सक्रिय करणं आवश्यक आहे. विशेष सैन्याच्या तैनातीचा उल्लेख इंटेलिजन्स ग्रिडच्या अहवालात आहे. त्यामुळे त्यांना भूप्रदेश आणि ऑपरेशनचं अपेक्षित स्वरुप माहीत आहे.