महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेन्स्कींची गळाभेट; तुमचा मोठा प्रभाव आहे, रशिया युद्धात मधस्थी केल्यास आनंदच; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास - PM Modi Meets Zelenskyy - PM MODI MEETS ZELENSKYY

PM Modi Meets Zelenskyy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट देत राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेन रशिया युद्धात मध्यस्थी करायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही तुमचा मोठा प्रभाव आहे, तुम्हीच व्लादिमीर पुतिन यांना थांबवू शकता, अशा शब्दात त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

PM Modi Meets Zelenskyy
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 8:11 AM IST

कीव, युक्रेन PM Modi Meets Zelenskyy :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव इथं भेट देऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट घेत त्यांना भारत हा नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता देश असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुमचा मोठा प्रभाव आहे. युक्रेन आणि रशिया युद्धात भारतानं युद्धविराम करुन शांतता प्रस्थापित करण्यास मध्यस्थी केल्यास आनंदच होईल, असं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट देत राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांना दिलं. भारत हा नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता असलेला देश आहे. भारतानं नेहमीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना सांगितल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

तुमचा मोठा प्रभाव आहे, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची स्तुतीसुमने :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट दिल्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुमचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही रशिया आणि युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी केल्यास आम्हाला आनंदच होईल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. याबाबत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला बोलतानाही याबाबतची माहिती दिली.

देशाविरोधात एका माणसाचं युद्ध :रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. रशियानं युक्रेनवर अनेक हल्ले केले आहेत. मात्र हे युद्ध अद्यापही थांबण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारत आपली भूमिका बजावेल. भारतानंही हे एका माणसाचं एका देशाविरोधात युद्ध असल्याचं ओळखलं आहे. या एका माणसाचं नाव व्लादिमीर पुतिन आहे. पुतीन यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा प्रभाव आहे, त्यामुळे तुम्ही पुतीनला थांबवू शकता, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका जागतिक परिप्रेक्षात महत्वाचीच नाही तर आणखी काय... - Russia Ukraine war
  2. Modi Talks with Zelenskyy: पीएम मोदींचा फोनवरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी संवाद, म्हणाले 'युद्ध हे उत्तर नाही'
  3. Ukraine plane crashes : ग्रीसमध्ये युक्रेन एअरलाइनचे मालवाहू विमान कोसळले

ABOUT THE AUTHOR

...view details