हैदराबाद : भारतीय स्मार्टफोन उत्पादक ब्रँड लावा भारतीय बाजारात सतत नवीन उपकरणे लाँच करत आहे. कंपनीनं अलीकडेच एक हँडसेट लाँच केला आहे. आता कंपनीनं एक नवीन स्मार्टवॉच लावा प्रोवॉच व्ही१ लाँच केली आहे. या घड्याळात अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. प्रोवॉच व्ही१ मध्ये 1.85 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या घड्याळात 2.5D GPU ॲनिमेशन इंजिन आहे. त्यात GPS आणि IP68 रेटिंगसह अनेक आरोग्य देखरेख वैशिष्ट्ये आहेत. चला जाणून घेऊया या घड्याळाची खास वैशिष्ट्ये.
लावा प्रोवॉच व्ही1 ची किंमत
लावानं त्यांची नवीन स्मार्टवॉच 2399 रुपयांना लाँच केली आहे. ही किंमत स्मार्टवॉचच्या सिलिकॉन स्ट्रॅप प्रकारासाठी आहे. ती इतर प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे. लवकरच तुम्ही हे घड्याळ किरकोळ दुकानांमधून खरेदी करू शकाल. सिलिकॉन स्ट्रॅप ब्लॅक नेबुला, ब्लूश रोनिन, मिंट शिनोबी आणि पीची हिकारी या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही स्मार्टवॉच येते. त्याच वेळी, त्याचा मेटल स्ट्रॅप दोन रंग आणि किंमतींमध्ये येतो. पीची हिकारी मेटल व्हेरिएंटची किंमत 2699 रुपये आहे, तर ब्लॅक नेब्युला मेटल व्हेरिएंटची किंमत 2799 रुपये आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन?
लावा प्रोवॉच व्ही1 मध्ये 1.85 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये रियलटेक 8773 चिपसेट आहे, जो दैनंदिन वापरानुसार चांगला परफॉर्मन्स देतो. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ व्ही 5.3 कनेक्टिव्हिटीसह येतं. यात जीपीएसची सुविधा देखील आहे, जी या बजेटमधील बहुतेक घड्याळांमध्ये येत नाही. कंपनीचं म्हणणे आहे की यात VC9213 PPG सेन्सर आहे, ज्याच्या मदतीनं हृदय गतीसह आरोग्याचं निरीक्षण केलं जाऊ शकते. हे घड्याळ 110 स्पोर्ट्स मोडसह येतं. लावाच्या स्मार्टवॉचमध्ये योगा, धावणे आणि इतर वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. चांगली गोष्ट म्हणजे हे घड्याळ IP68 रेटिंगसह येतं. कंपनीने ही वाच प्रोवॉच व्हीएनची आवृत्ती म्हणून लाँच केलीय. प्रोवॉच व्ही1 च्या बॅटरी स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
हे वाचलंत का :