महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये मतदानाला सुरूवात; मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक केयर स्टारर यांना पराभूत करणार का? - Voting IN Britain

Voting IN Britain : ब्रिटनमध्ये आज सकाळपासून सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. निवडणुकीत लाखो लोक मतदान करणार आहेत. या निवडणुकीत ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि केयर स्टारर (Keir Starmer) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 1:45 PM IST

Voting IN Britain
ब्रिटनमध्ये मतदान (ETV BHARAT Hindi Desk)

लंडन Voting IN Britain: ब्रिटनमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मतदानाला सुरुवात झालीय. मतदान केंद्रे स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. दरम्यान, शुक्रवारी सकाळी निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे. निवडणुकीत मुख्य लढत कंझर्व्हेटिव्ह आणि मजूर पक्षांमध्ये आहे.

ऋषी सुनक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात : बोरिस जॉन्सन यांच्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे दुसऱ्या टर्मसाठी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. तर लेबर पार्टीचे केयर स्टारर (Keir Starmer) हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. तत्पूर्वी, 22 मे रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी गुरुवारी मतदान केलंय.

कंझर्व्हेटिव्ह पक्ष 14 वर्षांपासून सत्तेत : ब्रिटनमध्ये गेल्या 14 वर्षांपासून कंझर्व्हेटिव्ह पक्षाची सत्ता आहे. या काळात पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांनी देशाची धुरा सांभाळली. ब्रिटनच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मजूर पक्ष निवडणूक जिंकू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वेक्षणात लेबर पार्टीच्या केयर स्टारर यांना 650 संसदीय जागांपैकी 484 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

  • सुनक यांचे मतदारांना आवाहन : सनक यांनी मतदारांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या 20 महिन्यांच्या कार्यकाळात कोविड-19 आणि युक्रेनमधील युद्धानंतर अर्थव्यवस्थेला सकारात्मक दिशेने नेले आहे. त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पूर्ववर्तींच्या अंतर्गत अनेक वर्षांचा गोंधळ टळला आहे.

कंझर्वेटिव्ह पक्षाची काय आहेत आश्वासने : या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंझर्वेटिव्ह पक्षानं महागाई, सार्वजनिक आरोग्य, संरक्षण खर्चात वाढ, ब्रिटनचा जीडीपी 2.5% वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासोबत देशाला मजबूत अर्थव्यवस्था करण्याचं त्यांच्या पक्षाचं लक्ष्य असल्याचं सुनक यांच्या पक्षाचं म्हणणं आहे. याशिवाय कर चुकवेगिरी, आश्रय-शोधकांना रवांडामध्ये पाठवण्याचं मतदारांना वचन दिलं आहे.

हेही वाचा -

  1. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी मतदान : PM ऋषी सुनक संकटात; विद्यमान पंतप्रधानांना 'या' पक्षाचं आव्हान - UK Upcoming National Election
  2. इराणच्या निवडणुकीत असंतुष्ट मतदार राहात आहेत मतदानापासून दूर - Iran Supreme leader Ali Khamenei
  3. अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प फेस टू फेस; काय आहे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'? - First Presidential Debate

ABOUT THE AUTHOR

...view details