मुंबई -क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या संघाबाहेर असला तरी, त्याचे वैयक्तिक आयुष्य आता चर्चेत आले आहे. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा त्याच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही काळापासून या जोडप्याच्या वेगळे होण्याच्या बातमीनं इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हार्दिक पांड्यानंतर आता युजवेंद्रच्या घटस्फोटाबद्दल लोक सोशल मीडियावर बोलत आहेत. सुरुवातीला या चहलनं धनश्रीबरोबरचे फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले होते. यानंतर या जोडप्यानं नवीन वर्ष वेगवेगळे साजरे केले. आता सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा एका मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे.
युजवेंद्र चहलबरोबर कोण आहे मिस्ट्री गर्ल : या फोटोमध्ये, ती मुलगी काळ्या स्वेटशर्ट आणि काळ्या डेनिममध्ये युजवेंद्र चहलबरोबर मागे चालताना दिसत आहे. या मुलीनं तिचा हात हा स्वत:च्या चेहऱ्यावर ठेवला आहे. यामुळे तिचा पूर्ण चेहरा हा दिसत नाही. एका हॉटेल लॉबीमध्ये दोघेही दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आता लोक प्रश्न करत आहेत, की ही मुलगी कोण आहे आणि युजवेंद्र तिच्यासोबत काय करत आहे? दरम्यान यूजर्सनं या मुलीला ओळखलं आहे. आता अनेकजण फोटोच्या कमेंट विभागात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक असा दावा करत आहेत की या फोटोमध्ये आरजे महाविश आहे.
धनश्री वर्मा (dhanashree verma - instagram) युजवेंद्र चहल झाला ट्रोल : युजवेंद्र चहलला आरजे महाविशबरोबर पाहिल्यानंतर लोक त्याला ट्रोल करत आहे. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'ही आरजे महविश आहे.' तर दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलं,'आरजे महविश आणि चहल जुहूमधील एका हॉटेलमध्ये आहेत.' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये चहल हा दारू पिऊन क्लबमधून बाहेर पडताना दिसत होता. सध्या या जोडप्यामध्ये काय चालले आहे, हे काहीही समोर आलेलं नाही. याशिवाय सोशल मीडियावर धनश्रीनं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं ,'गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठीण होते. निराधार बातम्या, तथ्य तपासणीशिवाय बातम्या आणि अज्ञात ट्रोलमुळे माझे चारित्र्य बदनाम झालं आहे. द्वेष पसरवण्याचे प्रयत्न होत आहे. माझे नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी मी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले होते. माझे मौन हे कमकुवतपणा नाही, तर ताकद आहे. सोशल मीडियावर नकारात्मकता सहजपणे पसरवता येते, मात्र इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे यासाठी धाडस लागते. मी माझ्या सत्याशी ठाम राहून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. खऱ्याला पुराव्याची गरज नाही.' आता पोस्टमुळे धनश्रीच्या मनात काय आहे, हे सर्वांना कळले आहे.
हेही वाचा :
- युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माबद्दल प्रतीक उतेकरनं अफेअरच्या अफवांवर सोडलं मौन
- का रे दुरावा... युजवेंद्र चहल-धनश्री वर्मांत होणार घटस्फोट? समोर आली मोठी अपडेट
- युझवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा, चाहत्यांचे डोळे विस्फारले