ETV Bharat / sports

भारतीय महिला ब्रिगेडविरुद्ध आयरिश संघ पहिला सामना जिंकत इतिहास रचणार? 'इथं' पाहा ऐतिहासिक मॅच लाईव्ह - INDW VS IREW 1ST ODI LIVE

भारत विरुद्ध आयर्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

INDW vs IREW 1st ODI Live Streaming
भारत महिला क्रिकेट संघ (BCCI Women X Handle)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 8 hours ago

राजकोट INDW vs IREW 1st ODI Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना 10 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारतीय संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात उतरणार : या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत कर्णधार हरमनप्रीत कौरला वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरसह विश्रांती देण्यात आली आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत, सलामीवीर स्मृती मंधाना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर अष्टपैलू दीप्ती शर्मा संघाची उपकर्णधार असेल.

आयरिश संघात अनुभवी खेळाडू : दुसरीकडे, गॅबी लुईस या मालिकेत आयर्लंडचं नेतृत्व करेल. याशिवाय, ओर्ला प्रेंडरगास्ट, अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज महिलांविरुद्ध वनडे आणि T20 मालिकेत शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघ या मालिकेत प्रवेश करेल. टीम इंडियानं वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिका 2-1 नं तर वनडे मालिका 3-0 नं जिंकली होती.

आयसीसी क्रमवारी कशी : भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना आयसीसी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळला जाईल. आयसीसी वनडे क्रमवारीत आयर्लंड महिला संघ 11व्या स्थानावर आहे. तर भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.

दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारतीय महिला आणि आयर्लंड महिला संघ वनडे सामन्यांमध्ये 12 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय महिला संघाचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. भारतीय महिलांनी 12 पैकी 12 वनडे सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला एकही विजय मिळालेला नाही. यावरुन भारतीय महिला संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. त्यातच भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.

खेळपट्टी कशी असेल : निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला. ही विकेट प्रथम फलंदाजीसाठी योग्य दिसते, नंतरच्या टप्प्यात गोलंदाजांना काही मदत होईल. आतापर्यंत या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. तथापि, नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करु शकतो. पण तरीही ही विकेट फलंदाजीसाठी चांगली असेल.

भारत महिला आणि आयर्लंड महिला संघात पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?

भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील पहिला वनडे सामना शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील पहिला वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला वनडे मालिका स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

भारतीय संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितस साधू, साईमा ठाकोर, सायली सातघरे

आयर्लंड संघ : गॅबी लुईस (कर्णधार), अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉफरन, एमी मॅग्वायर, लीह पॉल, ओर्ला प्रेंडरगास्ट, उना रेमंड-होई, फ्रेया सार्जेंट, रेबेका स्टोएकेल

हेही वाचा :

  1. 4,4,4,4,4,4,4... सहा चेंडूत सात चौकार; भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं, पाहा व्हिडिओ
  2. 'ज्या पद्धतीनं मला निवृत्ती घ्यावी लागली, त्यामुळं मी निराश...'; रिटायर होताच दिग्गजानं क्रिकेट बोर्डावर व्यक्त केली नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.