मुंबई : रॅपर-गायक 'यो यो हनी सिंग' हे मनोरंजन क्षेत्रातील एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यानं लोकांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. काही वर्षांपासून हनी सिंग हा चित्रपटसृष्टीपासून गायब होता. आता त्यानं मनोरंजन क्षेत्रात पुनरागमन केलंय. दरम्यान नेटफ्लिक्सवर हनी सिंगचा एक माहितीपट प्रसारित झाला आहे. याचं शीर्षक 'यो यो हनी सिंग फेमस' असं आहे. हा माहितीपट हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच्या माहितीपटामध्ये कॉन्सर्ट, मित्र-परिवार आणि कठीण काळाबद्दल दाखविण्यात आलं आहे. याशिवाय या माहितीपटामध्ये हनी सिंगनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
शिकागोमध्ये नेमकं काय घडलं : रॅपर हनी सिंगनं त्याच्या डॉक्युमेंट्रीमध्ये शिकागोमधील एक किस्सा सांगितला आहे. शाहरुख खानबरोबर टूरवर असताना त्याला वाटले की तो, शिकागो शोदरम्यान मरेल. हनी सिंगला त्यावेळी असं वाटलं की, कोणीतरी त्याच्याविरूद्ध षडयंत्र रचत आहे. यानंतर त्यानं शोसाठी तयार होण्यास नकार दिला. आयोजकांनी त्याला काही गोष्टीबद्दल विचारले. यानंतर तो वॉशरूममध्ये गेला आणि केस कापून परत आला आणि म्हणाला की, 'माझ्याकडे केस नाहीत.' यानंतर त्याला टोपी घालायला लावली. त्याचवेळी त्यानं आपल्याच डोक्यावर कॉफीचा मग मारला.
हनी सिंगची 'डेथ विश' : याशिवाय पंजाबी रॅपर हनीनं त्याच्या मानसिक आजाराबाबत देखील उघडपणे सांगितलं. त्यानं यात सांगितलं की, 'माझ्यावर खूप वाईट वेळ आली होती, मला असं वाटलं की सर्वजण माझ्याकडे पाहून हसत आहेत. जेव्हा मोलकरीण माझ्या घरी येत होती, तेव्हा मी घाबरत होतो. मला वाटत होतं की ती माझ्यावर हसत असेल आणि जमिनीवरचे रक्त पुसत असेल.' याशिवाय रॅपरनं असेही उघड केलं की तो दररोज मरण्याची इच्छा करत होता. त्याला तो काळ नरकासारखा वाटत होता. यानंतर त्याला कधी कधी असं वाटायचं की आपल्या घरात कोणीतरी मरणार आहे. यानंतर तो घरातील सदस्यांच्या खोल्या तपासत होता.
हनी सिंगच्या बहिणीनं त्याच्या एक्स पत्नीवर केला आरोप :हनी सिंगच्या बहिणीनं माहितीपटात त्याच्या पत्नीवर काही आरोप केले आहेत. हनी सिंगला काम करण्यास भाग पाडलं जात असल्याचं तिनं यामध्ये सांगितलं आहे. रॅपरच्या बहिणीनं खुलासा केला की परफॉर्मन्सच्या एक दिवस आधी, त्याला मानसिक आजाराची स्पष्ट चिन्हे दिसत होती. या दरम्यान हनी सिंगनं आपल्या बहिणीला काही संदेश पाठवले होते, त्यात त्यानं म्हटलं होतं, 'मला वाचव.' यानंतर हनी सिंगच्या बहिणीनं पुढे खुलासा केला की, तिनं याबद्दल त्याची पत्नी शालिनीला सांगितलं, तेव्हा तिनेच तिला हनी सिंहनं परफॉर्म केला पाहिजे असं म्हणायला भाग पाडलं होतं. या माहितीपटामध्ये आणखी खूप काही खुलासे करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
- यो यो हनी सिंगची डॉक्युमेंटरी 'यो यो हनी सिंग फेमस'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ
- गायक यो यो हनी सिंग माता कालीच्या दर्शनासाठी हरिद्वारला पोहोचला, पूजा करून घेतला संतांचा आशीर्वाद
- चाहत्यानं पायाला हात लावताच 'यो यो हनी सिंग' चकित, म्हणाला - 'इतका म्हातारा नाही झालोय' - yo yo honey singh