महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

साऊथ स्टार 'यश'नं 'रामायण' नाकारला, वाचा काय आहे नेमकं कारण... - Yash rejected Ramayana Movie

Yash and Ramayan movie : रणबीर कपूर स्टारर 'रामायण' चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार नाही, तो या चित्रपटाचा एक निर्माता म्हणून दिसणार आहे.

Yash and Ramayan movie
यश आणि रामायण चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 3:04 PM IST

मुंबई - Yash and Ramayan movie : सध्या सोशल मीडियावर नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंगही सुरू झालय. 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर हा खूप मेहनत करत आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीराम, साऊथ अभिनेत्री साई पल्लवी माता सीताच्या भूमिकेत आणि सनी देओल हा हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर आली होती. साऊथ सुपरस्टार यश 'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात होतं. आता मिळालेल्या माहितीनुसार तो रावणाच्या भूमिकेत दिसणार नाही.

यशनं नाकारला 'रामायण' चित्रपट : यश 'रामायण' चित्रपटाशी निर्माता म्हणून जोडला गेल्याचं समजत आहे. केजीएक स्टार यशनं रावणाची भूमिका नाकारली आहे. याआधी अशी बातमी समोर आली होती की, या चित्रपटासाठी त्यानं 150 कोटीची मागणी केली होती. यानंतर निर्मात्यांनी त्याला 80 कोटी देण्याचं ठरवलं होतं. जवळपास 80 कोटी रुपये घेण्याऐवजी त्यानं चित्रपट निर्मितीचा विचार केला आहे. दरम्यान नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरून अनेक फोटो लीक झाले आहेत. यामुळे आता निर्मात्यांनी सेटवर नो-फोन पॉलिसी लागू केली आहे. हा चित्रपट 2025 च्या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'रामायण' चित्रपटाबद्दल :मिळालेल्या माहितीनुसार बॉबी देओलला चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. रावणाचा धाकटा भाऊ विभीषणाची भूमिका साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती साकारू शकतो, असं बोललं जात आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये लारा दत्ता आणि शीबा चड्ढा देखील असणार आहेत. लारा दत्ता भगवान रामची सावत्र आई कैकेयीची भूमिका साकारणार आहे, तर शीबा मंथराच्या भूमिकेत झळकणार आहे. आता यश हा त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यश त्याच्या आगमी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदासनं केलंय. 'टॉक्सिक' चित्रपट ड्रग माफियांवर आधारित असलेला ॲक्शन चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार, नेहा धुपियाला दिली मोठी जबाबदारी - kartik ready for love relationship
  2. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी आरोपीला बजावली नोटीस - Munawar Faruqui
  3. हावडा ब्रिजवर 'रूह बाबा'च्या अवतारात दिसला कार्तिक आर्यन - kartik aryan shares picture

ABOUT THE AUTHOR

...view details