मुंबई : रॉकिंग स्टारर यश आता त्याच्या पुढील बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' चित्रपटच्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. यशनं त्याच्या 'केजीएफ' फ्रँचायझीद्वारे जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तेव्हापासूनच चाहते त्याचा पुढील चित्रपट 'टॉक्सिक'च्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. यश स्टारर 'टॉक्सिक' हा चित्रपट येत्या, काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. गेल्या वर्षी 'टॉक्सिक' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर यशचे चाहते 'टॉक्सिक' या चित्रपटाच्या पुढील अपडेटची वाट पाहत आहेत.
'टॉक्सिक' चित्रपटामधील नवीन पोस्टर : आज 6 जानेवारी रोजी यशनं त्याच्या चाहत्यांना 'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट दिली आहे. यश 8 जानेवारी रोजी त्याचा 39 वा वाढदिवशी साजरा करणार आहे. या दिवशी तो आपल्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देणार आहे. आज, 6 जानेवारी रोजी 'केजीएफ' स्टारनं 'टॉक्सिक' चित्रपटामधील एक पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो टोपी घालून विंटेज कारजवळ धूम्रपान करताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये यशचा चेहरा हा दिसत नाही, मात्र तो स्टाईलनं उभा आहे, ते पाहण्यासारखे आहे. यशनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'त्याला मुक्त करायचे आहे...'