महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024चा 'ताज' ध्रुवी पटेलनं जिंकला, व्यक्त केल्या भावना... - DHRUVI PATEL - DHRUVI PATEL

Miss India Worldwide 2024 : ध्रुवी पटेल अमेरिकेतील कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमची विद्यार्थिनी असून ती मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024ची विजेती झाली आहे. याशिवाय या स्पर्धेत कोण फर्स्ट रनर अप ठरलं याबद्दल जाणून घ्या...

Miss India Worldwide 2024
मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 (मिस इंडिया वर्ल्डवाइड (PTI Video- Canva))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 3:22 PM IST

Updated : Sep 20, 2024, 3:50 PM IST

वॉशिंग्टन Miss India Worldwide 2024 : अमेरिकेची कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल ही मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024ची विजेता ठरली आहे. ध्रुवीला बॉलिवूड अभिनेत्री आणि युनिसेफची राजदूत व्हायचं आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 झाल्यानंतर ध्रुवीचं वक्तव्यही समोर आलं आहे. न्यूजर्सीमध्ये एडिसन येथे राहणारी ध्रुवीनं मुकुट घातल्यानंतर म्हटलं, "मिस इंडिया वर्ल्डवाइड जिंकणे हा मोठा सन्मान आहे. हे मुकुटापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हा माझा वारसा आहे आणि माझी मूल्ये आहेत, हे जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा देतात."

इंडिया वर्ल्डवाइडचा किताब :मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत सुरीनामच्या लिसा अब्दोएलहाकला फर्स्ट रनर अप घोषित केलं आहे. नेदरलँडची मालविका शर्मा दुसरी उपविजेती ठरली आहे. मिसेस कॅटेगरीत त्रिनिदाद टोबॅगोच्या सुआन मौटेट या विजेत्या ठरल्या आहेत, तर स्नेहा नांबियार आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौर या दुसऱ्या क्रमांकावर विजेत्या ठरल्या. टीन कॅटेगरीमध्ये, ग्वाडेलोपमधील सिएरा सुरेटला मिस टीन इंडिया वर्ल्डवाइडचा किताब देण्यात आला. नेदरलँडच्या श्रेया सिंगला फर्स्ट रनर अप, तर सुरीनामच्या श्रद्धा टेडजोला सेकंड रनर अप घोषित करण्यात आलं. न्यूयॉर्क येथील इंडिया फेस्टिव्हल कमिटीनं या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

कोण आहे ध्रुवी पटेल? :या स्पर्धेचं नेतृत्व भारतीय-अमेरिकन नीलम आणि धर्मात्मा सरन करत आहेत. ही स्पर्धा यंदा 31 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. रिपोर्टनुसार ध्रुवी पटेल ही क्विनिपियाक यूनिवर्सिटीमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टमची विद्यार्थिनी आहे. याशिवाय ध्रुवीचे इंस्टाग्रामवर 18.6 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2023मध्ये ध्रुवीनं मिस इंडिया न्यू इंग्लंडचा किताब जिंकला होता. ध्रुवी ही थ्रीडी चॅरिटीज नावाची संस्था चालवते. स्वयंसेवा करण्याबरोबर ती गरजूंसाठी फूड ड्राइव्ह आणि निधी उभारणीचा देखील प्रयत्न करते. तसंच ती युनिसेफ आणि फीडिंग अमेरिका सारख्या धर्मादाय संस्थांसाठी काम करते. आता सोशल मीडियावर अनेकजण ध्रुवी पटेलवर किताब जिंकल्याबद्दल अभिनंदानाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Last Updated : Sep 20, 2024, 3:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details