मुंबई : साऊथ कोरियाची लोकप्रिय वेब सीरीज 'स्क्विड गेम' 26 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर दुसऱ्या सीझनसह प्रसारित होण्यासाठी सज्ज आहे. चाहते या शोच्या प्रीमियरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, नेटफ्लिक्सनं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये 'स्क्विड गेम 2' च्या रिलीजची वेळ देखील नमूद केली गेली आहे.'स्क्विड गेम'चा सीझन 2 हा 26 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. वेगवेगळ्या देशांमधील तिथल्या वेळेनुसार ही वेब सीरीज रिलीज होईल. दरम्यान भारतात ही सीरीज गुरुवारी दुपारी 1:30 वाजता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. 'स्क्विड गेम' ही वेब सीरीज 2021मध्ये आली होती. आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा या सीरीजचा दुसरा सीझन आल्यामुळे अनेकजण खुश आहेत.
'स्क्विड गेम' सीझन 2ची स्ट्रीमिंग वेळ
12:01 एम पीएसटी
3:01 पहाटे ईएसटी
5:01 पहाटे बीआरटी
8:01 सकाळी जीएमटी
9:01 सकाळी सीईटी
1:31 दुपारी आयएसटी
5:01 संध्याकाळी जेएसटी
5:01 संध्याकाळी केएसटी
'स्क्विड गेम' सीझन 2चे कलाकार :ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, वाई हा-जुन आणि गॉन्ग यू नवीन सीझनमध्ये त्यांच्या भूमिका पुन्हा सादर करतील. यिम सी-वान, कांग हा-न्युल, पार्क ग्यु-यंग, पार्क सुंग-हुन, जो यू-री, यांग डोंग-गेन, कांग ए-सिम, ली डेव्हिड, ली जिन-उक यांसारखे अनेक नवीन स्टार्स या सीरीजमध्ये दिसणार आहेत. दरम्यान 'स्क्विड गेम'च्या पहिल्या सीझनमध्ये एकूण 9 एपिसोड होते. आता 'स्क्विड गेम 2'च्या आगामी सीझनमध्ये सात एपिसोड्स असतील. सर्व सात भाग एकाच वेळी प्रसारित होईल. पहिल्या भागाचे शीर्षक 'ब्रेड अँड लॉटरी' आहे. दरम्यान 'स्क्विड गेम' एका क्लिफहँगरवर संपला होता.
'स्क्विड गेम'ची कहाणी :ली जंग-जे (सेओंग गि-हुन) हा गेमच्या बाहेर आल्यानंतर त्याच्या आयुष्याबद्दल विचार करताना दिसतो. यानंतर गेममध्ये घडलेल्या घटनेला विसरण्यासाठी तो नवीन सुरुवात करतो. तो अमेरिकेला जात असताना त्याला गॉन्ग यू, हा जो आपली ओळख सेल्समॅन म्हणून सांगतो, तो एका व्यक्तीला गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतो. यानंतर सेओंग गि-हुन या गेमचं सत्य उघण्यासाठी अमेरिकेला जाण्याऐवजी दक्षिण कोरियामध्ये राहण्याचा निर्णय घेतो. 'स्क्विड गेम' सीझन 2 येथून सुरू होईल. सेओंग गि-हुन हा यावेळी 'स्क्विड गेम'मध्ये बदला घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसणार आहे. आता यावेळी पुन्हा एका प्रेक्षकांना नवीन काही पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- नेटफ्लिक्सवर सुरू होणार जीवघेणा मृत्यूचा खेळ, 'स्क्विड गेम सीझन 2' चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित
- स्क्विड गेम सिझन 3 मध्ये सामील होण्यासाठी लिओ डिकॅप्रिओला मिळू शकते आमंत्रण