मुंबई - Shah Rukh Khan and Gauri khan : हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी अनेकांना आवडते. अनेकदा हे जोडपं वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. 'किंग खान' आणि गौरी व्यग्र शेड्यूलमधून आपल्या मुलांसाठी नेहमीच वेळ काढतात. आता अलीकडेच गौरी खान तिच्या मुलांबरोबर गेटवे ऑफ इंडियावर दिसली. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये गौरी, सुहाना खान आणि अबराम खानबरोबर गेट वे ऑफ इंडियावर बोटीच्या दिशेने जाताना दिसत आहे. दरम्यान गौरी खानने नुकतेच मुंबईत तिचे रेस्टॉरंट तोरी लॉन्च केले आहे. ती आपल्या बिझी शेड्युलमधून कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवत आहे.
व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया : व्हायरल व्हिडिओमध्ये गौरी खान, अबराम आणि सुहाना खान गेटवे ऑफ इंडियावर बोटिंगचा आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये शाहरुख कुठे आहे हे विचारण्यास सुरुवात केली. व्हिडिओत अबराम बोटिंगसाठी सर्वात जास्त उत्साही दिसला. तो एकटाच होता, ज्यानं लाईफ जॅकेट घेतलं होतं. आता चाहत्यांना 'किंग खान'च्या कुटुंबाचा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, ''सुरक्षेची काळजी घेणारी एकमेव व्यक्ती अबराम.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''फक्त अबरामने लाइफ जॅकेट घेतले.'' आणखी एकानं लिहिलं, ''हा बॉलिवूडचा दुसरा किंग खान असणार आहे.'' याशिवाय काहीजणांनी या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.