मुंबई - Family Star Movie : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा 'फॅमिली स्टार' हा चित्रपट नुकताच 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 'फॅमिली स्टार' चित्रपटानं 19 दिवसात बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, मात्र अनेकांना विजय आणि मृणालमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली. 'फॅमिली स्टार' आता 26 एप्रिल रोजी तेलुगू आणि तमिळमध्ये अॅमॅझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. आता तुम्हाला विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायची असेल, तर अॅमॅझोनवर हा चित्रपट पाहू शकता.
' फॅमिली स्टार'ची स्टार कास्ट : सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत प्रचंड चर्चा आहे. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरशिवाय या चित्रपटामध्ये दिव्यांशा कौशिक, अजय घोष आणि वासुकी यासारखे कलाकार आहेत.'फॅमिली स्टार' चित्रपटामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली आहे. विजय देवरकोंडाबरोबर दिग्दर्शक परशुरामचा हा दुसरा चित्रपट असून त्यांनी याआधी 'गीता गोविंदम'मध्ये एकत्र काम केलं होत. या चित्रपटामध्ये विजयबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. या चित्रपटामधील गाणी ही प्रचंड गाजली होती. विजय आणि रश्मिकाची जोडी अनेकांना आवडली होती.