मुंबई:अभिनेता विकी कौशल स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अद्भुत टीझरमुळे चाहत्यांमध्ये, चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विकीनं 'छावा'चा एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
'छावा'चं ट्रेलर होणार 'या' दिवशी प्रदर्शित :विकी कौशलनं 'छावा' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. या चित्रपटामध्ये तो शंभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान अद्भुत संगीत, सुंदर लूक आणि दमदार व्हीएफएक्सनं सजवलेले हे मोशन पोस्टर पाहून विकी कौशलचे चाहते त्याचे आता कौतुक करत आहेत. दरम्यान या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विकीनं लिहिलं, 'तो अग्नी आहे, तो पाणी आहे, तो वादळ आहे आणि तो सिंह शिवाचा पुत्र देखील आहे, 'छावा'चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.'