मुंबई Vicky Kaushal : मुंबईतील 'लालबागचा राजा' गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी विकी कौशल गेला होता. विकीच्या आधी अनेक स्टार्सनी येथे येऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. यामध्ये रणबीर कपूर आपल्या कुटुंबासह बाप्पाच्या दर्शनासाठी गेला होता. आता विकी कौशल बाप्पाचे आशीर्वाद घेत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस विकी कौशलबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर विकी कौशलनं देखील आनंदानं पोलीस फॅनबरोबर सेल्फी काढली. बाप्पाच्या दर्शनासाठी विकी हा एकटाच पोहोचला होता. विकीबरोबर त्याची पत्नी कतरिना कैफही दिसली नाही. दरम्यान विकीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर यावेळी त्यानं पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. याशिवाय त्यानं त्याच्या पायात चप्पल घातलेली नव्हती. तो गणेशाच्या दर्शनासाठी अनवाणी पायानं चालत आला.
विकी कौशलचा व्हिडिओ व्हायरल : आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये, विकी कौशल ईशा देओलला भेटतो आणि दोघे रस्त्यावर चाहत्यांबरोबर मस्ती करताना दिसतात. आता त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता हे व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत. विकीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "हा खूप सुंदर दिसतो." दुसऱ्या एकानं या पोस्टवर लिहिलं, " कतरिना कैफ कुठे आहे." आणखी एकानं लिहिलं, "खूप सुंदर." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करताना दिसत आहेत.