ETV Bharat / entertainment

हिमेश रेशमियाचे वडील विपीन यांचं निधन, कुमार सानू आणि इतर सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त - vipin reshammiya passed away - VIPIN RESHAMMIYA PASSED AWAY

Himesh Reshammiya father Demise : संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक हिमेश रेशमियाचे वडील विपिन यांचं 18 सप्टेंबर रोजी निधन झालंय. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

Himesh Reshammiya father Demise
हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन (हिमेश रेशमियाच्या वडिल विपिन रेशमियाचं निधन (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 19, 2024, 11:37 AM IST

मुंबई - Himesh Reshammiya father Demise : सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाचे वडील विपीन रेशमिया यांचं निधन झालं आहे. विपिन रेशमिया एक यशस्वी संगीतकार होते. या ज्येष्ठ संगीतकारानं वयाच्या 87 व्या वर्षी जगातून निरोप घेतला. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. विपिन रेशमिया हे लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी कुटुंबीयांना आशा होती. मात्र 18 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. हिमेश हा आपल्या वडिलांना संगीताच्या दुनियेतील गुरू मानत होता. हिमेशच्या वडिलांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रातून दुःख व्यक्त केलं जात आहे.

हिमेश रेशमियाच्या वडिलांचं निधन : रिपोर्ट्सनुसार, हिमेशचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारानं त्रस्त होते. विपिन रेशमिया यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज, 19 सप्टेंबर रोजी त्यांचा मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान ख्यातनाम पार्श्वगायक कुमार सानू यांनी हिमेशचे वडील विपीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर हिमेश रेशमियाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कुमार सानू यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत विपिन रेशमिया, कुमार सानू आणि हिमेश रेशमिया दिसत आहेत.

कुमार सानू यांनी वाहिली श्रद्धांजली : कुमार सानू यांनी या पोस्टवर विपिन रेशमिया यांना श्रद्धांजली देत लिहिलं, 'विपीनजींच्या निधनाची बातमी ऐकून मी दु:खी झालो आहे, ते खूप दयाळू व्यक्ती होते, हसतमुख होते. मी त्यांच्याबरोबर अनेक सुंदर क्षण घालवले आहेत. तुमची खूप आठवण येईल, ओम शांती.' दरम्यान कुमार सानू यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आता आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, 'विपिनजी यांच्या आत्म्याला शांती लाभो.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'ओम शांती.' आणखी एकानं लिहिलं, 'जुन्या आठवणी, ओम शांती.' आता काही स्टार्स देखील पोस्ट शेअर करून शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.