ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा जोनास 'सिटाडेल 2'मध्ये नादियाच्या भूमिकेत परतली, सेटवरील व्हिडिओ व्हायरल - Citadel 2 - CITADEL 2

Priyanka Chopra and Citadel 2 : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर 'सिटाडेल 2' च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या वेब सीरीजमध्ये ती नादियाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे.

Priyanka Chopra and Citadel 2
सिटाडेल 2आणि प्रियांका चोप्रा (Etv Bharat (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 19, 2024, 12:38 PM IST

मुंबई - Priyanka Chopra and Citadel 2 : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. पती निक जोनासचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आता ती आपल्या कामावर परतली आहे. अमेरिकन वेब सीरीज 'सिटाडेल'चा दुसरा सीझन हा येणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. बातमी खरी असल्याचे संकेत मिळाले आहेत. या वेब सीरीजमध्ये प्रियांका चोप्रा जोनास हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेनबरोबर दिसेल. या वेब सीरीजमध्ये प्रियांका नादियाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. तिनं काही काळापूर्वी 'सिटाडेल'च्या सेटवरची एक झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे.

प्रियांका चोप्रानं शेअर केली पोस्ट : 18 सप्टेंबर रोजी प्रियांकानं इन्स्टाग्रामवर 'सिटाडेल' सीझन 2 च्या सेटवरचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'नादिया परत आली आहे. सिटाडेल सीझन 2.' या पोस्टमध्ये तिनं एक शस्त्र, लाल हार्ट आणि व्हिडिओ कॅमेरा इमोजी जोडला आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवात तिच्या क्लोज-अप शॉटमधील मिरर सेल्फीनं होते. यानंतर ती गाडीमध्ये बसून 'सिटाडेल 2' च्या सेटवर जाताना दिसते. या व्हिडिओत 'देसी गर्ल'नं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. याशिवाय तिचे अर्धे केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत. काळ्या सनग्लासेसमध्ये प्रियांकाचा लूक खूप सुंदर दिसत आहे. या क्लिपमध्ये प्रियांका म्हणते, "चल माझ्याबरोबर सेटवर." याशिवाय यानंतर ती पांढऱ्या पोशाखात कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसते.

चाहत्यांनी केलं प्रियांकाचं कौतुक : क्लिपमध्ये पुढं जारमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, तिला झालेल्या जखमा देखील ती दाखवते. यापूर्वी प्रियांकानं 'सिटाडेल 2' च्या स्क्रिप्टची झलक दाखवली होती. प्रियांकाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'ती भारतीची देसी गर्ल नाही, ती जागतिक देसी गर्ल आहे. मिस देसी.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'तू खूप सुंदर दिसत आहे, मी 'सिटाडेल 2'च्या रिलीजची वाट पाहत आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'नादिया पुन्हा परत आली आहे.' 'सिटाडेल'चा पहिला सीझन 2023मध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला होता. प्रियांका आणि तिचा सहकलाकार रिचर्ड या वेब सीरीजमध्ये एजंट मेसन केन आणि नादिया सिंगच्या भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं पतीला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, निक जोनासनं लंडन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कापला केक - NICK JONAS BIRTHDAY
  2. प्रियांका चोप्रा पती निक जोनासबरोबर सुट्टीत झाली रोमँटिक, बिकिनीवरचे फोटो व्हायरल - PRIYANKA CHOPRA share pics
  3. निक जोनास-देसी गर्लची जोडी पुन्हा चर्चेत, मित्राच्या लग्नात दिसला रोमॅंटिक अंदाज - Nick Jonas shares a romantic photo

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.