ट्रेंट ब्रिज England vs Australia 1st ODI Live Streaming : T20 मालिकेनंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात 5 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ डिसेंबर 2023 नंतर प्रथमच वनडे सामना खेळणार आहे. इंग्लंडला शेवटच्या वेळी वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी 2024 नंतर मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियानं शेवटच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता.
A MASSIVE series ahead 🙌
— England Cricket (@englandcricket) September 19, 2024
They don't come much bigger...
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/10mQPTXxRU
नियमित कर्णधाराशिवाय इंग्लंड मैदानात : दुखापतीमुळं बाहेर असलेला इंग्लंडचा संघ नियमित कर्णधार जॉस बटलरशिवाय मैदानात उतरेल. त्याच्या अनुपस्थितीत युवा हॅरी ब्रूककडं संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जो पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यांचं पुनरागमन होणार आहे, जे T20 मालिकेत संघाचा भाग नव्हते.
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 19 सप्टेंबर 2024, ट्रेंट ब्रिज, सायंकाळी 5 वाजता
- दुसरा वनडे : 21 सप्टेंबर 2024, हेडिंग्ले, दुपारी 3:30 वाजता
- तिसरा वनडे : 24 सप्टेंबर 2024, सीट युनिक रिव्हरसाइड, सायंकाळी 5 वाजता
- चौथा वनडे : 27 सप्टेंबर 2024, लॉर्ड्स, सायंकाळी 5
- पाचवा वनडे : 29 सप्टेंबर 2024, सीट युनिक स्टेडियम दुपारी 3:30 वाजता
Trent Bridge training! 💪 😤
— England Cricket (@englandcricket) September 18, 2024
ODI time loading ◼◼◼◻
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/Ex6AxYkrHU
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवार 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार ,सायंकाळी 5.00 वाजता सुरु होईल.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना भारतात टीव्हीवर कुठे पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर पाहू शकता.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
- इंग्लंड एकदिवसीय संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
- ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा
हेही वाचा :