ETV Bharat / sports

'साहेबां'च्या कर्णधाराचं मोठं ऑपरेशन, मैदानावर कधी परतणार; समोर आली मोठी अपडेट - BEN STOKES SURGERY

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बेन स्टोक्सला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. आता यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या पुनरागमनाची ताजी माहिती दिली आहे.

Ben Stokes Surgery
बेन स्टोक्स (Screenshot from X)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 18 hours ago

लंडन Ben Stokes Surgery : इंग्लंडचा क्रिकेट संघ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळं त्याला रुग्णालयात जाऊन मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. याबाबत त्यानं सोशल मीडियावर एक नवीन माहिती दिली आहे. स्टोक्सनं शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पायाचा एक फोटो शेअर केला, ज्यात तो ब्रेस घातलेला दिसत आहे. तो गाडीत आहे आणि पायाखाली उशीही ठेवली आहे. चित्र पाहून असं म्हणता येईल की दुखापत गंभीर होती, त्यासाठी मोठं ऑपरेशन करावं लागलं. आता तो मैदानात परत कधी येणार, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

स्टोक्स कधी करणार पुनरागमन : शस्त्रक्रियेनंतर बेन स्टोक्सच्या पायात बसवलेलं मशीन पाहिल्यानंतर तो किती दिवस मैदानाबाहेर राहणार हा प्रश्न आणखी गडद झाला. अहवालानुसार, त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, लवकरच तो ॲक्शनमध्ये दिसणार असल्याचे संकेत त्यानं आपल्या पोस्टमध्ये दिले आहेत. इंग्लंडच्या कर्णधारानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'शस्त्रक्रिया झाली आहे. म्हणूनच मी काही दिवसांसाठी बायोनिक माणूस झालो आहे. लवकरच परत येईल.' त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीतून स्टोक्स : बेन स्टोक्स हा इंग्लंड संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो दुखापतीचा बळी ठरला होता. यानंतर तो न्यूझीलंड दौऱ्यावर कर्णधार आणि अष्टपैलूच्या भूमिकेत पूर्णपणे तंदुरुस्त परतला. पण हॅमिल्टनमधील सामन्यादरम्यान त्याला अचानक हॅमस्ट्रिंगची समस्या उद्भवली आणि त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. तो 2023 च्या वनडे विश्वचषकाचा भाग होता आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार होता ज्याचं आयोजन पाकिस्ताननं केलं आहे. पण दुखापतीमुळं शस्त्रक्रियेनंतर त्याच्या बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळं 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेतून तो आधीच बाहेर पडला आहे. इंग्लंडनं त्याला आपल्या संघात स्थान दिलेलं नाही. तसंच मे महिन्यापर्यंत एकही कसोटी सामना नसल्यामुळं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहून त्याच्या रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करणार आहे.

हेही वाचा :

  1. यजमान संघ मालिका जिंकणार की पाहुणे 10 वर्षांनी विजय मिळवत बरोबरी करणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. 18 वर्षांनंतर कॅरेबियन संघ 'या' देशात दाखल; खेळणार दोन सामन्यांची मालिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.