ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024: विधानसभा निकालावर आक्षेप घेत 35 पराभूत उमेदवारांची खंडपीठात धाव - DEFEATED CANDIDATE TAKES OBJECTION

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लागून आता बराच काळ लोटला तरी, पराभूत झालेल्या उमेदवारांचं अद्यापही समाधान झालं नाही. 35 पराभूत उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेतला आहे.

Defeated Candidate Takes Objection
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लागलेला निकाल अनेक राजकीय पक्षांना मान्य झालेला नाही. त्यामुळे बहुतांश पराभूत उमेदवारांनी त्यावर साशंकता व्यक्त केली. काही जणांनी तर फेरमतमोजणी करण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. तर न्यायालयात जाण्याची शेवटची तारीख असताना तब्बल 35 पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवत औरंगाबाद खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे.

या उमेदवारांनी घेतली खंडपीठात धाव : राज्यात अनेक मतदार संघात धक्कादायक पराभव मातब्बर उमेदवारांना स्वीकारावे लागले. त्यातील काही जणांनी खंडपीठात धाव घेतली. यामध्ये कैलास गोरंट्याल (जालना) यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात, सर्जेराव मोरे (लातूर) यांनी रमेश कराडांविरोधात, प्रवीण चौरे यांनी मंजुळा गावित यांच्या विरोधात, महेबूब शेख (आष्टी, जि. बीड) यांनी सुरेश धस यांच्या विरोधात, राजेश टोपे (घनसावंगी) यांनी हिकमत उढाण यांच्या विरोधात, राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्या विरोधात, राजू शिंदे (छत्रपती संभाजीनगर-पश्चिम) यांनी संजय शिरसाटांविरोधात याचिका दाखल केली आहे. बीडच्या केज मतदार संघातील पराभूत उमेदवार पृथ्वीराज साठे (केज) यांनी नमिता मुंदडा यांच्या विरोधात, बबलू चौधरी (बदनापूर) यांनी नारायण कुचेंविरोधात, चंद्रकात दानवे (भोकरदन) यांनी संतोष दानवे यांच्या विरोधात, बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ पाटील यांच्या विरोधात, सतीश पाटील (पारोळा) यांनी अमोल पाटील यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. याशिवाय राणी लंके, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोटे, संदीप वर्पे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.

ईव्हीएम बाबत पराभूत उमेदवारांना संशय : विधानसभा निवडणूक2024 चा निकाल लागल्यावर इव्हिएमबाबत संशय व्यक्त करण्यात आला. पराभूत उमेदवारांनी काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. काही जणांनी मशीनमधील अकडे आणि प्रत्यक्षात असलेले आकडे यात तफावत असल्याचा आक्षेप नोंदवला. याबाबत निवडणूक आयोगाकडं बहुतांश पराभूत उमेदवारांनी तक्रारी केल्या. त्याचप्रमाणं व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची मागणी केली. मात्र निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे याचिका करण्यात आल्या आहेत. निवडणूक निकालाच्या नंतर याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यानं मोठ्या प्रमाणावर या याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड व्हि. डी. सोळुंखे, संभाजी टोपे, सिद्धेश्वर ठोंबरे, विजय लटंगे, रवींद्र गोरे, सुश्मीता दौड, मुकूल कुलकर्णी, ज्ञानेश्वर बागुल, के. बी. धोंगडे, विक्रम धोर्डे आदींनी काम पाहिले.

फेरमतमोजणी अद्याप नाहीच : नोहेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी काट्याची टक्कर झाली. काही मतांनी पराभव झालेल्या अनेक उमेदवारांनी तर काही भागात पडलेली मतं अमान्य असल्याचं सांगत यंत्रात दोष असल्याचा आक्षेप नोंदवला. तर फेरमतमोजणी घेण्याची मागणी करत नियमानं पैसे भरून अर्ज केले. अद्याप त्यावर कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे न्यायालयात दाखल या याचिकांवर काय निर्णय होतो, त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. "ईव्हीएम हटवा, देश वाचवा", विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
  2. निवडणूक संपली तरीही राजकीय नेत्यांची एकमेकांविरोधातील खालच्या पातळीची भाषा थांबेना....
  3. 2024 च्या निवडणुकीत महायुतीच्या 'या' पाच योजना ठरल्या गेमचेंजर; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.