ठाणे - ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उच्चभू गृहसंकुलात निघृण हत्या घडली. सोमवारी सकाळी इमारतीची साफसफाई करणारा कर्मचारी विशाल खंडरा याला इमारतीच्या टेरेसवर मृतदेह धडापासून शीर वेगळे केलेल्या अवस्थेत दिसला. त्वरित त्यानं सुपरवायझर नागेश ठाकरे याला प्रकार सांगितला. ठाकरे यानं मोबाईलमध्ये फोटो घेऊन कापूरबावडी पोलिसांना हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर कळविले.
सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटली - रविवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर सोमवारी (१६ सप्टेंबर) रोजी सकाळी ९ वाजता ठाणे पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी धडकले. पोलिसांनी इमारतीचे आणि इमारतीच्या लिप्टचे सीसीटीव्ही तपासले. त्यात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुपरवायझर सोमनाथ याच्यासोबत आरोपी प्रसाद कदम यानं सुरक्षा रक्षकांचा ड्रेस परिधान करून लिफ्टनं वरच्या माळ्यावर जाताना दिसला. तसेच लिप्टमधील सीसीटीव्हीतही दोघे दिसले. आरोपी प्रसाद कदम याच्या हातात पांढरी पिशवी आणि पाठीवर सॅक होती. सीसीटीव्हीत प्रसाद यानं सुरक्षा रक्षकांचा ड्रेस काढून पांढरा शर्ट घालून दीड वाजण्याच्या सुमारास पायऱ्यानं खाली उतरताना दिसला. त्याच्या तोंडावर मास्क होता. तर दोन्ही हात हे लाल रंगाने माखलेले दिसलं.
गुन्हे शाखा युनिट-५ द्वारे मागोवा काढून अटक- घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून निष्पन्न झालेल्या आरोपी प्रसाद कदम या २१ वर्षीय तरुणाचा मागोवा काढीत गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने तांत्रिक अभ्यास करून आरोपीला सांगली येथून अटक केली. युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि पोलीस पथकानं यापूर्वीही चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पती-पत्नी वृद्धाची हत्या प्रकरण बऱ्याच काळानं गुंता सोडविला होता. आता पुन्हा पोलीस पथकाला यश मिळाले.
जेवणानंतर हत्या? इमारतीच्या टेरेसवर सुरक्षा रक्षक हे जेवण बनवित होते. रविवारी जेवणानंतर आरोपी प्रसाद कदम यानं ८ हजार मागितले. सोमनाथनं आईवरून गलिच्छ शिवी दिली. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या झाली. मृतदेहाच्या शेजारीच काही अंतरावर पोलिसांना चायनीज पदार्थाची पाकिटे, लाल रंगाचा चायनीज सॉस, स्टीलचा टोप, २ मोबाईल, सुरक्षारक्षकांची खांद्यावरची फीत, शर्टचे बटण आणि इतर वस्तू आढळल्या. पार्टी झाल्यानंतर आरोपी प्रसाद यानं धारदार शस्त्रानं पाठीवर, चेहऱ्यावर आणि मानेवर विळ्याचे वार केले. तर धडापासून शीर वेगळे करून हत्या करून पोबारा केल्याचा संशय परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिसत आहे.
आईवरून शिवीगाळ केल्याने हत्या ? मृत सुपरवायझर सोमनाथ यानं आईवरून गलिच्छ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपीनं निघृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही प्रसाद यानं अन्य ठिकाणी शिवीगाळ आणि रागातून मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर सोमनाथ यानं आईवरून दिलेल्या शिव्या या प्रसादच्या जिव्हारी लागल्या होत्या. त्यानं क्राईम पेट्रोलसारख्या गुन्हेविषयक सीरियल पाहून हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
हेही वाचा-