मुंबई - Diljit Dosanjh :गायक दिलजीत दोसांझ हा त्याच्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमुळे सध्या चर्चेत आहे. 13 एप्रिल रोजी मुंबईत एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. आता या कॉन्सर्टमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिलजीत दोसांझनं या कॉन्सर्टमध्ये आपल्या सुंदर आवाजानं लोकांना डान्स करण्यास भाग पाडले होते. मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी करोडो चाहते स्टेडियमवर पोहोचले होते. म्युझिकल नाईटमध्ये बी-टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या कॉन्सर्टमध्ये खूप धमाल केली. या दोन्ही कलाकारांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये मुनवर फारुकी आणि अवनीत कौरही दिसले.
दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट :याशिवाय या कॉन्सर्टमध्ये बी-टाऊनच्या क्यूट कपल्सपैकी एक, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा देखील हजर होते. या कॉन्सर्टदरम्यान दोघेही हातात हात घालून जाताना दिसले. या जोडप्यानं पापाराझींसाठी पोझही दिली. मनीष पॉल, विकी कौशल, करण कुंद्रा, अंगद बेदी यांच्यासह अनेक कलाकारांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला होता. 'क्रू' चित्रपटाच्या यशानंतर दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहचलेली क्रिती सेनॉन तिच्या स्टाईलिश अंदाजात दिसली. काळ्या टी-शर्टमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. क्रिती तिची बहीण नुपूर सेनॉनबरोबर होती. याशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वरुण धवन क्रितीचा हात धरून आहे.