मुंबई : प्रेमाचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिना सर्वांसाठी विशेष असतो. व्हॅलेंटाईन वीकचे वातावरण असल्यानं, अनेक जोडपी त्यांच्या जोडीदारांबरोबर हा आठवडा साजरा करण्याची करण्याच्या तयारीत आहे. 2025चा व्हॅलेंटाईन डे अनेक जोडप्यांसाठी खास असू शकतो. या प्रेमानं भरलेल्या आठवड्याच्या, पहिल्या दिवसाला 'रोज डे' म्हणतात. प्रेमाच्या आठवड्यात गुलाबाच्या फुलाचे विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या थीमवर आधारित गाण्यांबद्दल सांगणार आहोत. आजच्या दिवशी तुम्ही ही गाणी तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराला समर्पित करू शकता.
'अंखियां गुलाब' (तेरी बातों में ऐसा उल्झा जिया) :2014मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या रोमँटिक चित्रपटातील 'अंखियां गुलाब' हे गाणं रोज डेसाठी अगदी योग्य आहे. या गाण्याला मित्राजनं आवाज दिला आहे.
'फूल गुलाब का' (बीवी हो तो ऐसी) : जर तुम्हाला जुनी गाणी ऐकायला आवडत असेल तर, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हे गाणं शेअर करून तिचा दिवस आणखी खास बनवू शकता. रेखा आणि फारुख शेख यांच्या' बीवी हो तो ऐसी' चित्रपटामधील 'फूल गुलाब का' हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. या गाण्याचे बोल मनाला भिडणारे आहेत.'फूल गुलाब का' गाण्याला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि मौहम्मद अझीझ यांनी आवाज दिला आहे.